अकोला नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग कवडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:12 AM2017-12-28T02:12:21+5:302017-12-28T02:14:09+5:30
अकोला : अकोला नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग लक्ष्मण कवडे यांचे बुधवार, २७ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. अकोला नगर परिषदेचे उपाध्यक्ष व नगराध्यक्ष पद त्यांनी भूषविले आहे. अकोला नगरीचे शिल्पकार स्व. विनयकुमार पाराशर यांचे ते निकटवर्ती व सहकारी होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग लक्ष्मण कवडे यांचे बुधवार, २७ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. अकोला नगर परिषदेचे उपाध्यक्ष व नगराध्यक्ष पद त्यांनी भूषविले आहे. अकोला नगरीचे शिल्पकार स्व. विनयकुमार पाराशर यांचे ते निकटवर्ती व सहकारी होते. जनता बँकेचे उपाध्यक्षपदही अनेक वर्षे त्यांनी भुषविले आहे. अकोला नगरपालिकेच्या राजकारणात ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. तसेच स्व. पाराशर यांच्या नगर विकास फ्रंटचे ते ज्येष्ठ पदाधिकारी होते. त्यांनी अनेक वर्ष पार्टीची धुरा सांभाळली. नगर विकास फ्रंटला अनेकवेळा बहुमत मिळवून देण्यात त्यांचे योगदान राहिले. त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात अकोला शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात्त वामन, श्रीकृष्ण, उमाकांत, सूर्यकांत असे चार मुले, तर तीन मुली, आकाश कवडे नातवंडे, असा बराच आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांचे राहते घर जयहिंद चौक येथून गुलजारपुरा मोक्षधामकरिता निघणार आहे.