तिकिटासाठीचे ‘पॅनल’ आक्रमक
By admin | Published: October 8, 2014 01:07 AM2014-10-08T01:07:53+5:302014-10-08T01:07:53+5:30
अकोला जिल्हा कॉँग्रेसमध्ये होणार घमासान; निलंबित आजी-माजी पदाधिकारी येणार एकत्र.
अजय डांगे / अकोला
विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी कॉँग्रेसमध्ये तयार झालेल्या ह्यपॅनलह्णमधील सदस्य आक्रमक झाले असून, निलंबनाच्या कारवाईनंतर आजी-माजी पदाधिकारी एकत्र येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे कॉँग्रेसमधील अंतर्गत वाद ऐन निवडणुकीच्या काळातच चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी कॉँग्रेसमध्ये प्रचंड रस्सीखेच झाली होती. या मतदारसंघातून एकूण १७ इच्छुक उमेदवारांचे अर्ज जिल्हा कॉँग्रेस कमिटी तर्फे प्रदेश कार्यालयात मुलाखतीसाठी पाठविण्यात आले होते. उमेदवारीसाठी झालेली रस्सीखेच लक्षात घेऊन पक्षात आजी-माजी पदाधिकार्यांनी स्थानिक पातळीवर ह्यपॅनलह्ण स्थापन केले होते. यामध्ये तीन नगरसेवकांचाही समावेश होता. पॅनलमध्ये अल्पसंख्याक, मराठा, ओबीसी समाजातील इच्छुक उमेदवारांचा समावेश होता. या पॅनलने प्रदेश पातळीवरील नेत्यांची भेट घेतली होती. पॅनलमधील कुणालाही उमेदवारी दिल्यास त्याला निवडून आणण्याची ग्वाही पॅनलमधील सदस्यांनी नेत्यांना दिली होती. या पॅनलने अकोला पश्चिम मतदारसंघात ठिकठिकाणी बैठकाही घेतल्या होत्या. बैठकांना पॅनलमधील सदस्यांचे सर्मथक उपस्थित असायचे; मात्र प्रत्यक्षात पॅनलमधील एकाही सदस्याला उमेदवारी मिळाली नाही.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध प्रचार केल्याचा ठपका ठेवत पक्षाने सोमवारी सहा नगरसेवक आणि चार आजी-माजी पदाधिकार्यांसह एकूण १0 जणांना निलंबित केल्याने पक्षात असंतोष उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निलंबित केलेल्यांमध्ये पॅनलमधील सदस्यांचाही समावेश आहे.
* पॅनल घेणार कारवाईमागील ह्यहाताह्णचा शोध
प्रदेश कॉँग्रेसने केलेल्या निलंबनाच्या कारवाईमागे कोणाचा हात आहे, याचा पॅनलकडून शोध घेण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे येणार्या काळात पक्षातील अंतर्गत वाद वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या वादाचे पडसाद विधानसभा निवडणुकीत किती उमटणार किंवा उमटणार की नाही, हे येणार्या काळात स्पष्ट होईलच.