महावितरण मालमत्तेवर फलक; देवकमल हॉस्पिटलच्या संचालकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:45 AM2021-01-13T04:45:56+5:302021-01-13T04:45:56+5:30
शहरातील वीज खांब, रोहित्रे, फिडर पीलर, डी. पी. इत्यादी महावितरणच्या यंत्रणेवर किंवा यंत्रणेच्या अगदी जवळ, खाली अनेक ...
शहरातील वीज खांब, रोहित्रे, फिडर पीलर, डी. पी. इत्यादी महावितरणच्या यंत्रणेवर किंवा यंत्रणेच्या अगदी जवळ, खाली अनेक संस्था, व्यावसायिक, जाहिरातदारांनी आपल्या प्रचार प्रसिद्धासाठी अनधिकृत फलके, पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग लावले होते. याप्रकरणी महावितरणकडून संबंधितांना कायदेशीर नोटिसा देण्यात आल्या होत्या. महावितरणच्या जठारपेठ स्थित मालमत्तेवर लावलेली देवकमल हॉस्पिटलची जाहिरात हटविण्याबाबत संबंधित हॉस्पिटल प्रशासनाने महावितरणच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महावितरणने हॉस्पिटलचे डॉ.आशिष तापडिया यांच्याविरुद्ध विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत, तसेच मालमत्ता विदृपणास प्रतिबंध करण्याकरिता असलेले अधिनियम १९९५ अंतर्गत देण्यात आलेल्या तक्रारीवरून रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापुढे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तीव्र करण्यात येत असल्याने ज्या जाहिरातदारांनी आपली प्रचार साहित्ये काढली नाही त्यांनी काढून घ्यावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले.