पाणीपुरी बेतली अकाेलेकरांच्या जीवावर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:20 AM2021-04-28T04:20:23+5:302021-04-28T04:20:23+5:30
आज राेजी शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेना विषाणूचा माेठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे़ जानेवारी महिन्याच्या अखेरपासून शहरातील पूर्व ...
आज राेजी शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेना विषाणूचा माेठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे़ जानेवारी महिन्याच्या अखेरपासून शहरातील पूर्व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाबाधितांचा आकडा वाढल्याची परिस्थिती आहे़ फेब्रुवारी महिन्यात सदर दाेन्ही झाेन महापालिकेने काेराेनाचे हाॅटस्पाॅट ठरवल्यानंतही नागरिकांचा बाजारात किंवा अनावश्यक कामासाठी हाेणारा मुक्तसंचार अनेकांच्या अंगलट आला आहे़ २४ मार्च २०२० मध्ये केंद्र शासनाने अचानक ‘लाॅकडाऊन’ची घाेषणा केल्यामुळे हातावर पाेट असणाऱ्या वर्गाचे अताेनात हाल झाले हाेते़ या परिस्थितीत जून महिन्यानंतर सुधारणा हाेत असल्याचे पाहून टप्प्याटप्प्याने उद्याेग, व्यवसाय ‘अनलाॅक’ करण्यात आले़ त्यामुळे काेराेना संपल्याच्या आविर्भावात किरकाेळ व्यावसायिकांनी ठिकठिकाणी व्यवसाय सुरू केले़ यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरी, भाजीपाला व चहाविक्रीच्या व्यवसायाचा समावेश हाेता़ दाेन महिने घरात बंदिस्त असलेले नागरिकही बेभान झाल्यासारखे घराबाहेर निघाले़ काेराेनाचा संसर्ग कायम असताना प्रामुख्याने पाणीपुरी विक्रीच्या ठिकाणी उसळलेली गर्दी पाहता हीच पाणीपुरी अकाेलेकरांच्या जीवावर बेतल्याचे समाेर आले आहे़
सकाळी गल्लीबाेळात पाणीपुरीची विक्री
राज्य शासनाने सकाळी ७ ते ११ पर्यंत केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना परवानगी दिली आहे़ याचा फायदा उचलत आजही शहराच्या गल्लीबाेळात हातगाड्यांवरून पाणीपुरीची धडाक्यात विक्री हाेत आहे़ या ठिकाणी महिला व तरुणींची हाेणारी गर्दी पाहता प्रत्येक घरात काेराेनाचा संसर्ग हातपाय पसरत असल्याचे चित्र आहे़
पाणीपुरी, चहाविक्रीवर बंदीचा प्रस्ताव
शहरात काेराेनाबाधितांचीच नव्हे तर काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे़ ही गंभीर बाब ध्यानात घेता मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्या निर्देशानुसार बाजार विभागाने शहरात सकाळी ७ ते ११ या कालावधीत छुप्या मार्गाने पाणीपुरी तसेच चहाविक्रीच्या व्यवसायावर बंदी घालण्याचा प्रस्ताव तयार केला आहे़