पाेलीस अधीक्षकांनी घेतली वृंद परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:19 AM2020-12-06T04:19:32+5:302020-12-06T04:19:32+5:30

अकाेला : जिल्ह्यातील पाेलीस खात्यात कार्यरत असलेल्या पाेलीस अधिकारी व अंमलदारांची पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका ...

Paralis Superintendent held a group conference | पाेलीस अधीक्षकांनी घेतली वृंद परिषद

पाेलीस अधीक्षकांनी घेतली वृंद परिषद

Next

अकाेला : जिल्ह्यातील पाेलीस खात्यात कार्यरत असलेल्या पाेलीस अधिकारी व अंमलदारांची पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत यांनी शनिवारी वृंद परिषद घेतली.

या वृंद परिषदेत चर्चासत्र घेण्यात आले. तसेच पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांच्या कार्यालयीन शासकीय अडचणी, तक्रारी व समस्या साेडविण्यासाठी एक व्यवस्था ठरविण्यात आली. या तक्रारी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी पुढाकार घेतल्याने सर्व अंमलदार यांनी समाधान व्यक्त केले. यासाेबतच अंमलदार यांना शासकीय कामकाज करताना येणाऱ्या अडचणी, पोलीस लाइनमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, साफसफाई स्वच्छता, पोलीस लाइन परिसरातील रस्ते, पोलीस क्वाॅर्टर्सची दुरुस्ती, प्रलंबित मेडिकल देयक, प्रवासभत्ते हे तातडीने निकाली काढण्यासाठी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सूचना केल्या. पोलीस सबसिडी कॅन्टिंगला पुरेशी जागा मिळावी यासाठी हालचाली सुरू करण्यात आली आहे. पाेलीस अधिकारी, तपासी अंमलदार यांनी चांगले तपासकाम केलेले असेल त्यांना रिवार्ड व प्रशस्तिपत्र देण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यांनी केल्या........................................................

पाेलीस अधीक्षकांनी या केल्या सूचना

अकोला पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिस्त वर्तणूक, पोलीस जनता संबंध चांगले ठेवावे. तक्रारकर तक्रारर्त्यांसोबत चांगली वागणूक ठेवावी, गुन्हे घडू नये याकरिता गर्दीच्या ठिकाणी पायी गस्त करावी, गुन्हे दाखल करावेत व उघडकीस आणावेत, कोरोना संसर्गापासून योग्य दक्षता घ्यावी, अशा सूचना पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत व शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी केल्या.

Web Title: Paralis Superintendent held a group conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.