खड्डे बुजविण्यासाठी पारस ग्रामपंचायतीने घेतला पुढाकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:55+5:302021-06-22T04:13:55+5:30
पारस: निमकर्दा-पारस-बाळापूर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ...
पारस: निमकर्दा-पारस-बाळापूर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले होते. अखेर पारस ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेत या रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
निमकर्दामार्गे बाळापूर रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून, रस्त्याची चाळणी झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता होती. या गंभीर बाबीची दखल घेत पारस ग्रामपंचायतचे सरपंच संतोष रामदास साठे यांनी निमकर्दा मार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. पारस ग्रा.पं. प्रशासनाच्या वतीने पारस-बाळापूर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून खड्डे बुजविले. यावेळी ग्रा.पं. सदस्य शिवशंकर कडू यांनी परिश्रम घेऊन खड्डे बुजविले. (फोटो)
----------------------
निमकर्दा-पारस-बाळापूर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सध्या मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन खड्डे कायमस्वरूपी बुजवावे.
- संतोष साठे, सरपंच, पारस.