पारस प्रकल्पाचा विस्तार झालाच पाहिजे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:12 AM2017-07-18T01:12:32+5:302017-07-18T01:12:32+5:30
कृती समितीचा सभेत निर्धार, समितीच्या अध्यक्षपदी संदीप पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : पारस प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी सोमवारी झालेल्या विविध राजकीय पक्ष, प्रकल्पग्रस्ताच्या सभेत प्रकल्प संघर्ष कृती समितीची स्थापना सर्वानुमते करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड करण्यात आली. पारस येथे १७ जुलै रोजी राजकीय पक्षांच्या व सामाजिक संघटना, प्रकल्पग्रस्त शेतकरी, सुरक्षित बेरोजगार, कंत्राटदार संघटना व परिसरातील शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. शिवाजी चौक येथे झालेल्या सभेत पारस प्रकल्पाचा विस्तार झालाच पाहिजे, हा निर्धार सर्वानुमते जाहीर करण्यात आला.
नव्यानेच स्थापन झालेल्या कृती समितीच्यावतीने १८ जुलै रोजी पारस वीज प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांना निवेदन देण्याचे ठरले आहे. कृती समितीच्यावतीने निवेदनात आंदोलनाचा इशारा देण्यात येईल. त्यानंतर तांत्रिक सल्ल्यानुसार न्यायालयात न्याय मागताना तीव्र लढा देण्याची तयारी सर्वानुमते ठरवण्यात आली. या सभेला माजी शिवसेना जिल्हा उपप्रमुख, बाजार समिती सभापती सेवकराम ताथोड, कालीन लांडे, गणेश कडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी म्हैसने, युवक राकाँचे विपुल घोगरे, ग्रा.पं.सदस्य अविनाश खंडारे, माजी उपसरपंच सुरेंद्र खंडारे, माजी पं.स.सदस्य कैलास घोंगे, किशोर वानखडे, इलियास बेग, जाकीर भाई, रमेश ठाकरे, बंडू होनाळे, शे. फारूक शे. इब्राहीम, संजय होनाळे, शंकर कसुरकार, बाळू पाटील थारकर, दादाराव लांडे, जितेंद्र काटे, म.शा. भगत, मनोज गेबल, भीमराव शेळके, एस.एस. पुंडे, मारोती वानखडे, रोजंदारी मजदूर सेना महासचिव, तांत्रिक युनियनचे देवदत्त खंडारे, गजानन लक्ष्मण तायडे, संतोष भरणे, विजेंद्र खंडारे, गोपाल दिवनाले, गणेश नागे, मंगळे पांडे, गोपाल वाघ, वीज निर्मिती प्रगत कुशल प्रशिक्षिणार्थी कृती समिती अध्यक्ष लालबहादूर यादव, जमीरभाई, वहीदभाई आदींसह परिसरातील ४०० ते ५०० ग्रामस्थ उपस्थित होते.