आधार कार्डसाठी पालक वेठीस!
By admin | Published: July 10, 2015 01:31 AM2015-07-10T01:31:25+5:302015-07-10T01:31:25+5:30
शाळा प्रस्तावाच्या प्रतीक्षेत शिक्षण विभाग.
प्रवीण खेते / अकोला : जिल्ह्यात हजारो विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने शिक्षण विभागाने शाळा व व्यवस्थापनाला आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची यादी करून तसा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहे; परंतु आधार कार्डसाठी पालकांना वेठीस धरणाचा प्रकार शाळा व्यवस्थापनाकडून सुरू आहे. शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याऐवजी आधारकार्डची शक्ती केली जात असल्याने पालकांची चांगलीच धावपळ सुरू आहे. राज्यातील प्रत्येक मान्यताप्राप्त शाळेची, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांची तसेच विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती ऑनलाईन भरण्यासठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ह्यसरलह्णही (ऑनलाईन) संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नवीन शैक्षणिक सत्रापासून इयत्ता पहिली व त्या पुढील शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. असे असले तरी, जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाहीत. दुसरीकडे जिल्ह्यातील आधार कार्ड केंद्र सुरू नसल्याने नवीन आधार कार्ड काढणे शक्य नाही. यावर उपाय शिक्षण विभागाने आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची यादी करणे आणि आधार कार्ड केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनाला दिला आहे; परंतु शाळा व्यवस्थापन ढिम्म असल्याने अद्याप एकही प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठविला नाही. उलटपक्षी आधार कार्ड सक्तीचे म्हणून पालकांना वेठीस धरत असल्याचा प्रकार जिल्ह्यात सुरू आहे. परिणामी पालक आणि विद्यार्थ्यांची कोंडी होत आहे.