पालकांनी मुलांचा आत्मविश्वास वाढवावा - डॉ. विलास भाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:45 AM2020-01-01T11:45:45+5:302020-01-01T11:46:33+5:30

औद्योगिक वसाहतीतील लोकमत भवनमध्ये लोकप्रज्ञा पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. भाले बोलत होते.

  Parents should increase children's confidence - Dr. Luxurious spears | पालकांनी मुलांचा आत्मविश्वास वाढवावा - डॉ. विलास भाले

पालकांनी मुलांचा आत्मविश्वास वाढवावा - डॉ. विलास भाले

Next

अकोला: विद्यार्थ्यांना प्रज्ञावंत करायचे असेल, तर पालकांना त्यांचा आत्मविश्वास, निर्णय क्षमता वाढवावी लागणार आहे. तद्वतच त्यांच्या आवडीच्या विषयाची रुची ओळखून त्या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागणार आहे. मुलांची जिज्ञासा ओळखून वाटचाल केल्यास विद्यार्थी प्रज्ञावंत होण्यास पाठबळ मिळत असल्याचे प्रबोधन लोकमत ‘लोकप्रज्ञा’ पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.
औद्योगिक वसाहतीतील लोकमत भवनमध्ये लोकप्रज्ञा पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. भाले बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सहायक कामगार आयुक्त आर. डी. गुल्हाने, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे अतिरिक्त सहायक संचालक विजय निकोले व शॉप अ‍ॅक्ट अधिकारी आशिष खंडारकर उपस्थित होते. याप्रसंगी लोकमत अकोला आवृत्तीचे युनिट हेड अलोककुमार शर्मा, निवासी संपादक रवी टाले, लोकमत समाचारचे प्रभारी अरुणकुमार सिन्हा मंचावर उपस्थित होते. लोकमतचे संस्थापक अध्यक्ष स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करू न कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पुढे बोलताना कुलगुरू भाले म्हणाले, आजच्या या स्पर्धेच्या युगात मुलांचे बालपण हरविले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत विद्यार्थी पुस्तकात असतात. यंत्रावत होत चाललेले हे जीवन आहे. मुलांची आकलनशक्ती वाढली पाहिजे तसेच घरातूनच त्यांच्यावर संस्कार घडविणे अत्यंत गरजेचे आहे. लोकप्रज्ञा पुरस्कार उपक्रम प्रेरणादायी असून, विद्यार्थ्यांना यातून प्रोत्साहन मिळत असल्याचेही डॉ. भाले म्हणाले. गुल्हाने यांनी विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात जायचे, याची पालकांनी पाल्याची कल चाचणी, बुद्ध्यांक, अभिरुची, आवड, कौशल्य बघावे, तसे बघितल्यास कोणतीच परीक्षा कठीण नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी न घाबरता जे क्षेत्र निवडले, त्याचा सखोल अभ्यास केल्यास यशस्वी होता येते. लोकप्रज्ञा पुरस्कार विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यास प्रोत्साहन देत असल्याचेही ते म्हणाले. खंडारकर यांनी लोकप्रज्ञा पुरस्कार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी इच्छाशक्ती, सातत्य ठेवल्यास कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येत असल्याचेही ते म्हणाले. अरुणकुमार यांनी प्रास्ताविकात लोकप्रज्ञा पुरस्काराची माहिती दिली. संचालन आदिती कुळकर्णी यांनी केले. आभार मानव संसाधन व प्रशासन विभागाचे उपव्यवस्थापक रवींद्र येवतकर यांनी मानले. सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लोकप्रज्ञा पुरस्कार प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
 

लोकप्रज्ञा पुरस्कार विजेते
सोहम कीर्तीवार, सिद्धेश येवतकर, जिगिशा देशमुख, तेजस डाहाके, निहारिका येंडे, अर्णव कुटे, ईश्वरी गावंडे, अथर्व सावलकर, उत्कर्ष नाल्हे, बरवा बोडखे, श्रीश जामोदे, नंदिनी गेडाम, ऋषिराज अवस्थी, सानिया उझमा मो. रियाज, हर्षित वाल्हे, कार्तिक कुºहाडे, परम ढमाले, अनया भर्दिंगे, अनुराधा हाके, हर्षल कोथळकर, सुहानी शिंदे, श्रद्धा सवडतकर, वैष्णवी काळे, गार्गी देशमुख, तन्मय पोद्दुतवार, समर्थ सावलकर, निधीश्री ठाकरे, सोहम गवारे, प्रियांशी देशमुख, आर्या ठाकरे, अथर्व अवस्थी, अक्षरा लांडे, ऋतुजा बानाईत, ओम कुटे, मोहित गुल्हाने, मिलिंद गेडाम, कृष्णा वाळके, वेदांत धरमकर, पूर्वी केळकर, जय वानखडे, सुहानी लांडे, यश खुरसडे, मनीष राठोड, साबा फिरदोस मो. रियाज, सारस ढमाले, सौरभ हाके, दक्ष इंगळे, ओम शिंदे, रितिका वाळके, ऋतुजा गिºहे व पल्लवी सवडतकर.

 

Web Title:   Parents should increase children's confidence - Dr. Luxurious spears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला