परीस संस्था करणार अकोला व बुलडाणा जिल्ह्यांतील शैक्षणिक स्थितीचे सर्वेक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:20 AM2021-09-18T04:20:50+5:302021-09-18T04:20:50+5:30
गेल्या वर्षी कोविडमुळे गावात जाऊन असरचे सर्वेक्षण होऊ शकले नाही; परंतु मार्च २०२० मध्ये शाळा बंद झाल्यामुळे कुटुंब आणि ...
गेल्या वर्षी कोविडमुळे गावात जाऊन असरचे सर्वेक्षण होऊ शकले नाही; परंतु मार्च २०२० मध्ये शाळा बंद झाल्यामुळे कुटुंब आणि मुलांवर झालेला महामारीचा प्रभाव समजणे महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रीय पातळीवर हे आकडे गोळा करणे गरजेचे होते. असे २०२० एक फोन आधारित सर्वेक्षणाच्या रूपात केले गेले. ज्यामध्ये मूल कशा प्रकारे शिकत आहेत ते पाहिले गेले. कोविडमुळे गावात जाऊन सर्वेक्षण करणे अजूनही शक्य नाही; परंतु आता देशभरात शाळा उघडल्या आहेत किंवा उघडणार आहेत. त्यामुळे मुले कशा प्रकारे शिकत आहेत आणि शाळा उघडल्यामुळे घरी मुलांना आणि शाळांना कोणत्या समस्या येतात, ते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने होणार सर्वेक्षण
सर्वेक्षण यावर्षी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सर्वेक्षणाचे प्रशिक्षण १६ ते १८ सप्टेंबरपर्यंत होणार आहे. यावेळी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन दिल्लीचे प्रशांत गणवीर, प्रमोद मुगल उपस्थित राहणार आहेत. या सर्वेक्षण संस्था अतिशय कर्तव्यदक्षपणे पार पाडील, तसेच जिल्ह्यातील प्रत्यक्ष स्थिती मांडली जाईल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत तळोकार यांनी व्यक्त केला.