अकाेलेकरांसाठी ‘पार्किंग’ची हाेणार सुविधा; निविदा प्रसिध्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:20 AM2021-04-23T04:20:21+5:302021-04-23T04:20:21+5:30
शहरात महापालिका प्रशासनाच्या अखत्यारित असलेल्या खुल्या जागांवर पार्किंगची व्यवस्था उभारण्यात आली असली तरी शासकीय अनास्थेमुळे निविदा प्रसिध्द न करणे, ...
शहरात महापालिका प्रशासनाच्या अखत्यारित असलेल्या खुल्या जागांवर पार्किंगची व्यवस्था उभारण्यात आली असली तरी शासकीय अनास्थेमुळे निविदा प्रसिध्द न करणे, पार्किंग स्थळाच्या जागांवर अतिक्रमण थाटण्यात आल्याचे चित्र आहे़ वाहनतळांच्या जागा भाडेतत्त्वावर दिल्यास महापालिकेला माेठा आर्थिक महसूल प्राप्त हाेताे़ यापूर्वी मनपा प्रशासनाने संबंधित जागा भाडेतत्त्वावर दिल्या असता कंत्राटदारांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन हाेत असल्याचे समाेर आले़ वाहनांच्या सुविधेसाठी दिलेल्या जागा कंत्राटदारांनी लघु व्यावसायिक व फेरीवाल्यांना उपलब्ध करून दिल्या़ त्याबदल्यात संबंधित अतिक्रमकांकडून माेठी आर्थिक रक्कम वसूल केल्या जात हाेती़ या प्रकारामुळे वाहने ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच कुचंबणा हाेते़ अशावेळी नाइलाजाने नागरिकांना रस्त्यालगत दुचाकी किंवा चारचाकी वाहने उभी करावी लागतात़ मनपाची सूत्रे स्वीकारताच आयुक्त निमा अराेरा यांनी पार्किंगचा तिढा निकाली काढण्याचे संकेत दिले हाेते़ त्या अनुषंगाने शहरातील १३ जागांवर भाडेतत्वावर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने निविदा प्रसिध्द केली आहे़
काेराेनामुळे व्यवसायावर परिणाम
फेब्रुवारी महिन्यापासून काेराेनाचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणात वाढल्याचे समाेर आले आहे़ यादरम्यान, शासनाने कडक निर्बंध लागू केल्यामुळे सकाळी ११ वाजतानंतर रस्ते निर्मनुष्य हाेत आहेत़ अशा परिस्थितीत मनपाने वाहनतळाची निविदा प्रसिध्द केली़ काेराेनामुळे व्यवसाय काेलमडल्याचे चित्र असल्याने वाहनतळाची निविदा प्रक्रिया पूर्ण हाेते का, याकडे लक्ष लागले आहे़