निर्माणाधीन उड्डाणपुलाखाली वाहनांची पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:55 AM2021-01-08T04:55:28+5:302021-01-08T04:55:28+5:30
विनामास्क वाहनधारकांमध्ये धास्ती अकोला : गत आठवड्यापासून शहरातील विविध भागांत विनामास्क संचार करणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. ...
विनामास्क वाहनधारकांमध्ये धास्ती
अकोला : गत आठवड्यापासून शहरातील विविध भागांत विनामास्क संचार करणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. सोमवारी जयहिंद चौक परिसरात पोलिसांकडून अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे विनामास्क वाहनधारक दुरूनच मार्ग बदलत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, असे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात येत आहे.
ढगाळ वातावरणाचा आरोग्याला फटका
अकोला : गत आठवडाभरापासून जिल्ह्यातील हवामान कोरडे होते, मात्र सोमवारी अचानक जिल्ह्यात ढगाळ वातावरण झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. अचानक बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्यासह इतर आजारांचा धोका वाढला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्कचा वापर करावा, इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
नायलॉन मांजाची सर्रास विक्री
अकोला : संक्रांतीच्या निमित्ताने बाजारपेठेत पतंग आणि मांजा विक्रीला आले आहेत, मात्र यासोबतच बाजारपेठेत प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजाचीही विक्री होताना दिसून येत आहे. गत आठवड्यापासून शहरातील विविध भागांत पोलिसांमार्फत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यानंतरही शहरात नायलॉन मांजाची छुप्या मार्गाने विक्री सुरूच असल्याचे दिसून येत आहे.