पक्ष नाममात्रे : गटातटाने निवडणूक ठरली पाडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:21 AM2021-01-19T04:21:39+5:302021-01-19T04:21:39+5:30
अकोट : स्थानिक गावपातळीवर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्ष नाममात्रे ठरली. मात्र विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एकत्र ...
अकोट : स्थानिक गावपातळीवर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्ष नाममात्रे ठरली. मात्र विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एकत्र येऊन गटातटाने निवडणुकीत सक्रिय सहभाग घेत निवडणूक पाडवणूक ठरवली.
अकोट तालुक्यात ३५ ग्रामपंचायत निवडणुकीचे दणक्यात निकाल लागले. अनेक गावांत परिवर्तन झाले, तर काही गावांत बहुमता एवढी सत्ता कायम ठेवण्यात यश आले आहे. तालुक्यात कुटासा, मोहाळा या गावांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आमदार अमोल मिटकरी यांनी प्रारंभी अविरोध निवडणूक होण्यासाठी विकासनिधी पुढे केला. त्यानंतर पॅनल उभे करून गाव अस्तित्वाची लढाई लढली व जिकंली, तर दुसरीकडे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या गावात तर लोकसभा निवडणुकीचे वातावरणात होते. या ठिकाणी पटेल यांनी सत्ता काबीज केली, तर काही गावात परिवर्तन घडविण्याचे नादात पॅनलमधील काही उमेदवार पराभूत झाले, तर सत्ता कायम ठेवण्याचे धडपळीत मतदारानी पॅनलचे कर्णधार निवडून आणले. अनेक गावांत प्रतिष्ठेची निवडणूक होती. पंरतु सरपंचपदाचे आरक्षण वरून इंटरेस दिसून आले नाही. त्यामुळे निवडणूक दूरच पाडापाडीचे राजकारण खूप चालले. या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील लोकांचा सक्रिय सहभाग दिसून आला नाही, तर राजकीय पक्षाचे मोठे पुढारी, आमदार, खासदार यांनी अंग चोरत प्रचारात शिरकाव केला नाही. स्वतःचे निवडणुकीत कार्यकर्ते यांना वापरून घेतल्या गेले, मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही स्तरावरील कार्यकर्ते दुखावल्या गेला नाही पाहिजे यांची विशेष काळजी अकोट तालुक्यात घेतल्या गेली. त्यामुळे निवडणुकीची पक्षीय रंगत फिक्की पडली आणि गटातटाने पाडवणुकीला महत्त्व दिल्या गेल्याचा सूर निकालातून निघाला.
चौकट...
अकोट तालुक्यात महिलाराज
ग्रामपंचायत संख्या ३८ पैकी लाडेगाव, मंचनपूर आणि कोहा अविरोध झाल्या. ३५ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक ३३४ सदस्य निवडून आले. त्यापैकी
१८३ महिला विजयी झाल्या आहेत. यामध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गातून ८३, अनु.जाती महिला प्रवर्गातून ३३, अनु.जमाती महीलाप्रवर्गातून २२, नामाप्रगटातून महिला प्रवर्गातून ४५ अशा प्रवर्गातून महिला निवडून आल्या आहेत.