शेतीचा विचार करणारांचेच आता सरकार येणार - अनिल घनवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 05:42 PM2018-09-30T17:42:22+5:302018-09-30T17:43:48+5:30
आता शेतीचा विचार करणाऱ्या पक्षाचे यापुढे सरकार आरूढ होइल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले.
अकोला: सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी व शेती व्यवसाय मोडकळीस आला असून, याचा परिणाम व्यापारी,कामगार,लघू उद्योजक यांचेवर होत आहे. आता शेतीचा विचार करणाऱ्या पक्षाचे यापुढे सरकार आरूढ होइल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले. रविवारी एकदिवसीय अकोला दौºयावर आले असता स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रमुख सतीश दाणी, राष्ट्रीय प्रवक्ता ललित बहाळे, महिला आघाडी प्रमुख गीता खांदेभराड, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख सीमाताई नरोडे, अनिल चव्हाण,विदर्भ युवा आघाडी प्रमुख डॉ. निलेश पाटील,पश्चिम विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा,सतीश देशमुख,जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट उपस्थित होते. या वेळी पुढे बोलताना अनिल घनवट म्हणाले की,१२ डिसेंबर रोजी शिर्डी येथे होऊ घातलेले संघटनेचे अधिवेशन हे ऐतिहासिक होणार असून, याला देशभरातुन दहा लाख शेतकरी उपस्थित राहणार आहेत. आपण सर्वांनी तन ,मन, धनाने सहकार्य करण्याचे आवाहन अनिल घनवट यांनी केले. या बैठकीला तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर,बाळापूर प्रमुख शंकर कवर,माजी अध्यक्ष सुरेश जोगळे, डॉ. के. एस. शर्मा, चंद्रकांत झटाले, अक्षय झटाले, संदीप महल्ले,घनश्याम दादळे, सतीश सरोदे,संदीप मंगळे, सुरेश सोनोने, मंगेश रेळे, चंदू रेळे, दादा टोहरे, दिलीप वानखेडे, सतीश उंबरकार, कृष्णा नेमाडे,निलेश नेमाडे, राजाभाऊ देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.