तेल्हारा राज्यमार्गावरील खड्ड्यांनी प्रवाशी वैतागले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:18 AM2021-04-08T04:18:42+5:302021-04-08T04:18:42+5:30
तेल्हाऱ्याचे नाव काढले की, अंगावर काटाच उभा राहत असल्याने अनेकांनी तेल्हारा येणे तर सोडाच, तेल्हारावरून जाणेही टाळणे सुरू केले ...
तेल्हाऱ्याचे नाव काढले की, अंगावर काटाच उभा राहत असल्याने अनेकांनी तेल्हारा येणे तर सोडाच, तेल्हारावरून जाणेही टाळणे सुरू केले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून वरवट, तेल्हारा, वणीवारूळा, आडसूळ, तेल्हारा-हिवरखेड रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु कंत्राटदाराने या रस्त्याच्या कामात दुर्लक्ष केल्याने, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याला दंड ठोठावला. तरीही समस्या मार्गी लागली नाही. सद्यस्थितीत मुख्य रस्त्यावर इतकी भीषण परिस्थिती आहे की, साधे दुचाकी वाहन सुद्धा व्यवस्थित चालू शकत नाही. या सर्व रस्त्यावर गिट्टी व माती पडलेली असून वाहनांची व नागरिकांच्या मणक्याची पार वाट लागत आहे . रस्त्यावर दररोज अपघाताच्या घटना घडतात. यामध्ये काहींना जीव गमावला लागला. रस्त्यावर इतकी धूळ साचली आहे. धुळीमुळे चारचाकी वाहन तसेच बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना समोरचे काहीच दिसत नाही. गेल्या दोन वर्षांपासून जनतेला सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिक व ये-जा करणारे प्रवाशी वैतागले आहेत. रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका बसत असून पिकांवर मोठ्या प्रमाणात धूळ बसत असल्याने, पिकांची वाढ खुंटली आहे.
कंत्राटदार समोर लोकप्रतिनिधी व अधिकारी हतबल झाले आहेत. रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी अनेकदा बैठक घेऊन काम सुरू करण्यासाठी निर्देश दिले. परंतु कंत्राटदाराची आर्थिक बाजू सक्षम नसल्याने काम बंद पडले आहे. तेल्हारा मुख्य रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी जनतेने केली आहे.
फोटो :