पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांची होतेय गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:16 AM2020-12-23T04:16:28+5:302020-12-23T04:16:28+5:30
विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस सुरू सध्या अकोलामार्गे विशेष गाड्या धावत असून, या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या ...
विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस सुरू
सध्या अकोलामार्गे विशेष गाड्या धावत असून, या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या विदर्भ एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, हावडा-अहमदाबाद, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, तर दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड-श्रीगंगानगर, जयपूर-सिकंदराबाद, अमरावती-तिरुपती आदी गाड्यांचा समावेश आहे.
वर्धा-भुसावळ पॅसेंजर बंद
लॉकडाऊनपूर्वी अकोला स्थानकावरून भुसावळ-वर्धा, नरखेड-भुसावळ या मध्य रेल्वेच्या पॅसेंजर गाड्या सुरू होत्या. या दोन्ही गाड्या प्रवाशांसाठी सोयीस्कर व भाड्याच्या दृष्टीने परवडणाऱ्या होत्या. याशिवाय दक्षिण-मध्य रेल्वेच्या अकोला-पूर्णा व अकोला-परळी या पॅसेंजर गाड्याही प्रवाशांसाठी उपयुक्त होत्या. आता या गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
पॅसेंजर गाड्या बंद असल्याने विशेष गाड्यांमधून अधिक भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. आयत्या वेळी प्रवास करावयाचा झाल्यास प्रवाशांना एसटी बस किंवा खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. पॅसेंजर गाड्यांचे भाडे सामान्यांच्या खिशाला परवडणारे आहे. त्यामुळे या गाड्या सुरू करण्यात याव्या.
- अमोल इंगळे, प्रवासी संघटना