बसस्थानकात बेशिस्त पार्किंगमुळे प्रवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:23 AM2021-08-28T04:23:38+5:302021-08-28T04:23:38+5:30
अकोला :अकाेल्याच्या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये लालपरी चालकांसह प्रवाशांना साेडायला येणारेही बेशिस्त वागत आहेत तर चालकही कुठेही आणि कशीही ...
अकोला :अकाेल्याच्या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये लालपरी चालकांसह प्रवाशांना साेडायला येणारेही बेशिस्त वागत आहेत तर चालकही कुठेही आणि कशीही गाडी उभी करून निघून जात आहेत. यामुळे ठराविक फलाटांवर वाट पाहत बसलेले प्रवासी बुचकळ्यात पडतात. याबाबत आगार व्यवस्थापनाने लक्ष देण्याची गरज आहे.
अकाेला आगारातून जिल्ह्यांतर्गत सोबतच लांब पल्ल्यांच्या गाड्याही धावतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्याही असते. हे प्रवासी एसटी बसची वाट पाहत ठराविक फलाटावर येऊन उभे राहतात; मात्र त्याच फलाटावर येणाऱ्या बस इतरत्र ठिकाणी उभ्या केल्या जात असल्याने वयोवृद्ध प्रवाशांना बस आली कधी आणि गेली कधी, याचाही थांगपत्ता लागत नाही.
हा प्रकार मागील काही दिवसांपासून बसस्थानकावर सुरू असून, याकडे वरिष्ठांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे सध्या प्रवासी वाहतूक वाढली असल्याने प्रवासी मोठ्या प्रमाणात बसस्थानकावर येतात; मात्र बस अस्ताव्यस्त ठिकाणी पार्क करून चालक त्या प्रवाशांची एकप्रकारे दिशाभूल तर करीत नाहीत ना, असा सवाल यानिमित्ताने पुढे येत आहे.
उद्घाेषणाही कळत नाही अन् गाडी दिसत नाही
गाडी काेणत्या फलाटवर उभी आहे याबाबतची उद्घाेषणा नीट ऐकू येत नाही त्यामुळे प्रवाशांचा गाेंधळ उडताे, दुसरीकडे फलाट साेडून गाडी उभी राहिली तर प्रवाशांची तारांबळ हाेते. बुलडाणा गाडीच्या बाबतीत हा गाेंधळ नेहमीचाच आहे.
-प्रशांत साेळंके , प्रवासी
वृद्ध प्रवाशांना हवे मार्गदर्शन
वृद्ध प्रवाशांचा गाडी शाेधण्यासाठी गाेंधळ उडताे. अशावेळी ते सहप्रवाशांना विचारतात, प्रत्येक जण सहकार्य करताेच असे नाही त्यामुळे एस. टी. महामंडळाने याबाबत दक्षता घेऊन ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे
- संदीप काटकर, प्रवासी
प्रवेशद्वारावर ऑटाे तर आतमध्ये पार्किंगचा त्रास
अकाेला आगाराच्या प्रवेशद्वारावरच ऑटाेचालकांची गर्दी असते त्यामधून वाट काढत आत प्रवेश केल्यावर प्रवाशांना साेडण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांची बेशिस्त पार्किंग त्रासदायक ठरत आहे. या प्रकाराकडे काेणाचेच लक्ष नाही