राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पास प्रणाली बारगळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:46 PM2019-03-30T13:46:30+5:302019-03-30T13:46:36+5:30
अकोला: अकोल्यासह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात पास प्रणाली सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ही पास प्रणाली सुरळीत चालली; परंतु नंतर कागदच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत पास प्रणाली ठप्प करण्यात आली.
अकोला: अकोल्यासह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात पास प्रणाली सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ही पास प्रणाली सुरळीत चालली; परंतु नंतर कागदच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत पास प्रणाली ठप्प करण्यात आली. अकोला जीएमसीमध्ये ही प्रणाली नव्या स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र योग्य नियोजनाअभावी ही प्रणाली पुन्हा ठप्प पडली. त्यामुळे रुग्णालयात अस्वच्छता अन् रुग्णांच्या नातेवाइकांच्या वाढत्या गर्दीमुळे रुग्णसेवा प्रभावित होत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांपेक्षा त्यांना भेटायला येणाऱ्या नातेवाइकांची गर्दी जास्त असते. यावर नियंत्रणासाठी शासनाने जून २०१८ पासून राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पास प्रणाली सुरू केली होती. शासकीय रुग्णालयांमध्ये होणाºया गर्दीवर नियंत्रणासाठी शासनाने हा निर्णय घेतला होता. त्यानुसार मोठ्या थाटात ही प्रणाली राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सुरू करण्यात आली होती; मात्र नियोजनाअभावी ही प्रणाली हळूहळू ठप्प पडली. या पास प्रणालीवर कुणाचेच नियंत्रण नसल्याने नागपूर, अकोला, यवतमाळसह सर्वत्रच ही पास प्रणाली ठप्प पडली आहे. मध्यंतरी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बारकोड असलेली अद्ययावत पास प्रणाली सुरू करण्यात आली होती; परंतु योग्य नियोजनाअभावी तीदेखील बारगळली. परिणामी, रुग्णालयातील स्वच्छता आणि रुग्णसेवेवर प्रभाव पडला.
यापूर्वी कागदांचा अभाव!
शासनाच्या निर्देशानुसार पास प्रणाली सुरू करण्यात आली होती. तीन प्रकारच्या पासेस असून, त्याचे रंगही वेगवेगळे होते; परंतु रुग्णांना भेटायला येणाºया नातेवाइकांच्या तुलनेत पासेससाठी लागणाºया कागदांचा अभाव पडला होता.
डॉक्टर अन् रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये वादाची शक्यता वाढली!
पास प्रणाली बारगळल्याने शासकीय रुग्णालयात होणाºया गर्दीवरील नियंत्रण सुटले आहे. अपुरे मनुष्यबळ आणि ढासळलेल्या कारभारामुळे संतप्त रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जुन्या पास प्रिंट होऊन आल्या आहेत. त्यामुळे जुनीच पास प्रणाली राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बारकोड पास प्रणालीचा सध्या उपयोग केला जात नाही. मनुष्यबळ अपुरे असल्याने काही समस्या येतात. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी सहकार्य करावे.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.