पासपोर्ट कार्यालय अकोल्यात: १४०० अकोलेकरांनी काढले पासपोर्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 04:02 PM2019-03-22T16:02:47+5:302019-03-22T16:02:54+5:30
अकोला: अकोल्यात पासपोर्ट कार्यालय आल्यापासून तब्बल १४०० अकोलेकरांनी पासपोर्ट काढल्याची माहिती समोर आली आहे.
अकोला: अकोल्यात पासपोर्ट कार्यालय आल्यापासून तब्बल १४०० अकोलेकरांनी पासपोर्ट काढल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वी पासपोर्ट कार्ड तयार करण्यासाठी अकोलेकरांना नागपूरला जावे लागत असे.मात्र शासनाने गत जानेवारी महिन्यापासून अकोल्यात पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्याने अकोलेकरांना सुविधा उपलब्ध झाल्याने आता अकोला, बुलडाणा आणि वाशिमच्या नागरिकांनी पासपोर्ट काढण्यासाठी एकच गर्दी केली आहे. जानेवारीपासून अकोल्यात सुरू झालेल्या पासपोर्ट कार्यालयाने मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत १४०० कार्ड मंजूर केले. यामध्ये पुरुष, महिला आणि बालकांचा समावेश आहे. दररोज आॅनलाइन पासपोर्ट कार्ड काढणाऱ्यांचे अर्ज कार्यालयात येत आहेत. त्यानंतर आॅनलाइन अर्ज करणाऱ्यांना विशिष्ट तारीख आणि वेळ दिली जात आहे. तारीख आणि ठरावीक वेळ देणाºयांना अकोल्यातील ताजनापेठ पोस्ट आॅफिसमधील पासपोर्ट कार्यालयात प्रत्यक्ष हजर होऊन महिती द्यावी लागते. या ठिकाणी सादर केलेल्या दस्तऐवजांची चाचपणी केली जाते. त्यानंतर पासपोर्ट कार्यालय नागपूरकडे आॅनलाइन व्हेरिफिकेशन पाठविले जातात. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशननंतर पासपोर्ट कार्ड दिले जाते. असे अकोल्यातून १४०० पासपोर्ट कार्ड आतापर्यंत दिले गेले आहेत.
पासपोर्ट कार्यालयात मनुष्यबळाचा अभाव!
ताजनापेठ पोस्ट कार्यालयाच्या मागील बाजूस पासपोर्ट कार्यालय उघडण्यात आले आहे. केवळ दोन व्यक्तींच्या भरवशावर हे कार्यालय सुरू आहे. एक चपराशीदेखील कार्यालयात नाही. एका दिवसात जवळपास ५० व्हेरिफिकेशन या कार्यालयात केले जातात. एका व्यक्तीला किमान १० मिनिटे वेळ लागतोच. त्यामुळे या कार्यालयातील दोघांना जेवणासाठीदेखील वेळ मिळत नाही. दरम्यान, आॅनलाइन वेळात येथे कामकाज करावे लागत असल्यामुळे या दोन्ही कर्मचाºयांची तारांबळ उडत आहे.