अकोल्यात लवकरच उभे होणार पासपोर्ट कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:53 PM2018-12-30T12:53:08+5:302018-12-30T12:54:23+5:30
अकोला: जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट बनविण्यासाठी आता नागपूरला जाण्याची गरज राहणार आहे. अकोल्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात पासपोर्ट कार्यालय उभे राहणार आहे.
अकोला: जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट बनविण्यासाठी आता नागपूरला जाण्याची गरज राहणार आहे. अकोल्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात पासपोर्ट कार्यालय उभे राहणार आहे. पासपोर्ट कार्यालयासाठी शनिवारी सकाळी भूमिपूजन सोहळा पार पडला. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. पासपोर्ट कार्यालय उभारणीसाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेऊन शासनाकडून १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात झालेल्या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पोलीस अधिकारी भामरे, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने, पोलीस उपअधीक्षक (गृह) मडावी, पोलीस निरीक्षक संजय राऊत, रा. पोलीस निरीक्षक विकास तिडके प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थ्यांना पासपोर्ट बनविण्यासाठी नागपूर येथे जावे लागत होते. त्यात त्यांचा वेळ, पैसा व श्रम खर्च व्हायचे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सातत्याने पाठपुरावा केला, तसेच पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनीही पासपोर्ट कार्यालयाच्या विषयामध्ये लक्ष घालून त्यासाठी १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला. या नियोजित पासपोर्ट कार्यालयाचे बांधकाम येत्या चार ते पाच महिन्यांमध्ये पूर्ण होऊन नागरिकांना कार्यालय उपलब्ध होईल. कार्यक्रमाला माजी महापौर उज्ज्वला देशमुख, नगरसेवक हरीश आलिमचंदानी, नगरसेवक आशिष पवित्रकार, डॉ. अशोक ओळंबे, बाप्पू देशमुख व संजय तिमांडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)