चाळण झालेल्या रस्त्यावरही पॅचिंग

By Admin | Published: January 23, 2016 01:50 AM2016-01-23T01:50:13+5:302016-01-23T01:50:13+5:30

आयुक्तांनी उपटले ‘इन्स्टा पॅच’च्या प्रतिनिधीचे कान

Patching on the crammed street | चाळण झालेल्या रस्त्यावरही पॅचिंग

चाळण झालेल्या रस्त्यावरही पॅचिंग

googlenewsNext

अकोला: मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा कंत्राट घेणार्‍या ह्यइन्स्टा पॅचह्णनामक कंपनीने चक्क खड्डय़ांची चाळण झालेल्या रस्त्यावरही पॅचिंग केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकाराची गंभीर दखल घेत मनपा आयुक्त अजय लहाने यांनी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीचे कान उपटत देयकामध्ये कपात करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले आहेत.
शहरातील प्रमुख सिमेंट रस्त्यांच्या मधोमध भेगा पडल्या आहेत. प्रतिभा कन्स्ट्रक्शनने तयार केलेल्या सिमेंट रस्त्यांच्या मधातील भेगा वाढल्याने सदर रस्ते दुचाकी वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत. यासोबतच काही ठरावीक डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यापूर्वी खड्डय़ांची पॅचिंग करताना निकषानुसार कामे न झाल्याने अवघ्या एक-दोन महिन्यातच सदर रस्त्यांची पुन्हा ऐसीतैशी झाल्याचे चित्र आहे. या बदल्यात लाखो रुपयांची देयके अदा करण्यात आली. देयके अदा करण्यापूर्वी पॅचिंगच्या कामांचा दर्जा तपासण्याची गरजही बांधकाम विभागाला भासली नाही, हे विशेष. या सर्व बाबी लक्षात घेता मनपा आयुक्त अजय लहाने यांनी खड्डय़ाच्या आकारानुसार पॅचिंगच्या कामाची निविदा जारी केली.
ह्यइन्स्टा पॅचह्ण नामक कंपनीला वर्कऑर्डर देण्यात आली. खड्डय़ाचे मोजमाप करून प्रतिफुटाप्रमाणे पॅचिंग केल्यानंतर त्याचे देयक अदा करण्याची तरतूद आहे.
यादरम्यान, ज्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे किंवा त्यावर नवीन रस्त्याची निर्मिती करण्याशिवाय पर्याय नाही, अशा रस्त्यावर सुध्दा ह्यइन्स्टा पॅचह्णच्या वतीने खड्डे बुजविण्यात आले. श्रीवास्तव चौक ते कस्तुरबा गांधी रुग्णालयासमोरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असताना या रस्त्यावर पॅचिंगची कामे करण्यात आली. अर्थातच, जेवढे खड्डे वाढतील, तेवढय़ा प्रमाणात देयकाची रक्कमदेखील वाढणार आहे. हा प्रकार मनपा आयुक्त अजय लहाने यांच्या निदर्शनास आल्यानंतर
त्यांनी कंपनीच्या प्रतिनिधीची चांगलीच कानउघाडणी केली.

Web Title: Patching on the crammed street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.