पठार नदीला पूर; पनोरी-दनोरी गावाचा संपर्क तुटला! पर्यायी रस्ताही गेला वाहून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 07:51 PM2024-06-23T19:51:17+5:302024-06-23T19:52:04+5:30

पावसाळ्यामध्ये पठार नदीला पूर येत असल्याने दरवर्षी दनोरी-पनोरी या गावाचा संपर्क तुटतो.

Pathar river floods; Panori-Danori village lost contact An alternative route was also taken | पठार नदीला पूर; पनोरी-दनोरी गावाचा संपर्क तुटला! पर्यायी रस्ताही गेला वाहून

पठार नदीला पूर; पनोरी-दनोरी गावाचा संपर्क तुटला! पर्यायी रस्ताही गेला वाहून

हर्षल कोल्हे -

रेल (जि. अकोला) : येथून जवळच असलेल्या दनोरी-पनोरी गावालगतच्या पठार नदीवर नवीन पुलाचे काम सुरू आहे. या नदीला पूर आल्याने ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी असलेला पर्यायी रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून, पनोरी गावचा मुख्य बाजार पेठेशीही संपर्क तुटला आहे.

पावसाळ्यामध्ये पठार नदीला पूर येत असल्याने दरवर्षी दनोरी-पनोरी या गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलन करून गावासाठी पठार नदीवर पूल मंजूर करून घेतला. गेल्या चार महिन्यांपासून या पुलाचे काम संथगतीने चालू असून, ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी पुलालगत कच्चा पर्यायी रस्ता बांंधलेला आहे. २२ जूनच्या मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसाने पठार नदीला पूर आला व पर्यायी रस्ता वाहून गेला. यामुळे या गावांचा संपर्क तुटला.
 

Web Title: Pathar river floods; Panori-Danori village lost contact An alternative route was also taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.