पातूर कृषी उत्पन्न बाजार समिती विकासाच्या प्रतीक्षेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:14 AM2021-06-01T04:14:45+5:302021-06-01T04:14:45+5:30
पातूर : पातूर येथे १९७२ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यात आली. जवळपास अर्धशतक स्थापनेला झाले. परंतु कृषी ...
पातूर : पातूर येथे १९७२ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यात आली. जवळपास अर्धशतक स्थापनेला झाले. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास तर सोडाच बाजार समितीला जमीन विकण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत ३५ अडते व जवळपास १५० व्यापाऱ्यांना व्यापारासाठी परवाना दिला आहे.
परिसरातील शेतकरी मोठ्या बाजारपेठा जवळ असल्यामुळे शेतमाल आणत नाहीत. नाफेड खरेदी सुरू झाल्यामुळे हरभरा तूर खरेदीवर सेस मिळत नाही. फळे-भाजीपाला सुद्धा नियमनमुक्त झाल्यामुळे सेस मिळत नाही. पर्यायाने उत्पादनात घट होऊन पायाभूत सुविधाही शेतकऱ्यांना पुरविण्यात बाजार समिती असमर्थ ठरत आहे. यामुळे जवळपास अर्धशतक उलटूनही कृषी उत्पन्न बाजार समिती विकासाच्या प्रतीक्षेत आहे.
फोटो:
पायाभूत सुविधेचा अभाव
कृषिमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा पुरविणे हे बाजार समितीचे कर्तव्य आहे. परंतु शेतकऱ्याचा माल ठेवण्यासाठी गोडाऊन नाही, टीन शेड आहेत ती अपुरी पडत आहेत. व्यापाऱ्यांसाठी पक्की दुकाने नाहीत, शेतकऱ्यांसाठी शिदोरी घर नाही. शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. शौचालयांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे
===Photopath===
300521\3347img-20210530-wa0177.jpg
===Caption===
पातूर कृषी उत्पन्न बाजार समिती