पातूर-बाळापूर बससेवा दीड वर्षापासून बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:23 AM2021-08-13T04:23:13+5:302021-08-13T04:23:13+5:30

पातूरवासीयांना बाळापूर हे उपविभागीय दर्जा असलेला महसुली गाव आहे. त्याबरोबरच रस्त्यावर अनेक शैक्षणिक संस्था आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी दररोज ...

Pathur-Balapur bus service closed for a year and a half! | पातूर-बाळापूर बससेवा दीड वर्षापासून बंद!

पातूर-बाळापूर बससेवा दीड वर्षापासून बंद!

Next

पातूरवासीयांना बाळापूर हे उपविभागीय दर्जा असलेला महसुली गाव आहे. त्याबरोबरच रस्त्यावर अनेक शैक्षणिक संस्था आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी दररोज ये-जा करतात; मात्र गेल्या दीड वर्षापासून एसटी महामंडळाच्या दोन्ही बस बंद करण्यात आल्या आहे. त्या अद्यापही सुरू न झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली. परिणामी, पातूर-बाळापूर महामार्गावर खासगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात फोफावली. सामाजिक अंतराचे भान खासगी प्रवासी वाहनधारकांकडून ठेवले जात नसल्यामुळे कोरोनाचा धोकाही निर्माण झाला आहे.

पातूर-बाळापूर रस्त्यावर डॉ. वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालय पातूर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मिनी एमआयडीसी, महावितरणचे कार्यालय, देऊळगाव, बाबुळगाव, चान्नी फाटा, वाडेगाव, आदी महत्त्वाचे बस थांबे आहे; मात्र या महामार्गावर बस सेवा बंद करण्यात आली असून, ती तातडीने सुरू व्हावी.

- प्रकाश गिरी, प्रवासी

Web Title: Pathur-Balapur bus service closed for a year and a half!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.