पातूर-खानापूर मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:20 AM2021-05-18T04:20:04+5:302021-05-18T04:20:04+5:30
पातूर : पातूर-खानापूर मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला शनिवारी दुपारी पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराने पाईपलाईन फुटल्याने ...
पातूर : पातूर-खानापूर मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला शनिवारी दुपारी पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराने पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून गेले. याकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. १५ मे रोजी दुपारी पातूर-खानापूर मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची पाईपलाईन फुटल्याने उन्हाळ्यात ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.
मात्र, हा पाण्याचा भरदिवसा होत असलेला अपव्यय थांबविण्याची मागणी होत आहे. अन्यथा भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाईपलाईन फुटून हजारो लिटरचा पाण्याचा अपव्यय झाला. याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
फोटो: फोटो मेलमध्ये