म्युकरमायकोसिसच्या रुग्णाला लागतात दिवसाला पाच इंजेक्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:14 AM2021-06-20T04:14:45+5:302021-06-20T04:14:45+5:30
दररोज करावी लागते इंजेक्शनची मागणी दाखल रुग्णसंख्येनुसार सर्वोपचार रुग्णालय प्रशासनातर्फे आरोग्य उपसंचालक कार्यालयात दररोज ऍम्पोटेरेसिन बी इंजेक्शनची मागणी करावी ...
दररोज करावी लागते इंजेक्शनची मागणी
दाखल रुग्णसंख्येनुसार सर्वोपचार रुग्णालय प्रशासनातर्फे आरोग्य उपसंचालक कार्यालयात दररोज ऍम्पोटेरेसिन बी इंजेक्शनची मागणी करावी लागते. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध इंजेक्शनमधून पुरवठाही केला जातो; मात्र मागणीच्या तुलनेत इंजेक्शन कमी प्रमाणात दिले जातात. रुग्णालय प्रशासनाला ही कसरत रोजच करावी लागत आहे.
...तर फंगसचा होऊ शकतो मेंदूत शिरकाव
म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची सुरुवात साधारणत: रुग्णाच्या नाकातून किंवा तोंडातून होते. हळूहळू या बुरशीचा फैलाव रुग्णाच्या डोळ्यांमध्ये व नंतर मेंदूपर्यंत होऊ शकतो. वेळीच उपचार न मिळाल्यास रुग्णाचा डोळा काढण्याची वेळ येऊ शकते. तसेच फंगस मेंदूमध्ये शिरल्यास रुग्णाचा जीव वाचविणे कठीण असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.
म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी रुग्णांना इंजेक्शन देणे गरजेचे आहे; मात्र मागणीच्या तुलनेत ते मिळत नाही. इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. डॉक्टरांसोबतच वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून रुग्णाच्या उपचारांसाठी आवश्यक सर्वच प्रयत्न करीत आहेत.
- डॉ. दिनेश नैताम, वैद्यकीय उपअधीक्षक, जीएमसी, अकोला