जीएमसीत शस्त्रक्रियेसाठी रुग्ण वेटिंगवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:23 AM2021-09-05T04:23:17+5:302021-09-05T04:23:17+5:30
स्त्रीरोग विभागावर सहा जिल्ह्यांचा भार सर्वोपचार रुग्णालयासह जिल्हा स्त्री रुग्णालयात अकोल्यासह बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि हिंगोली या जिल्ह्यांतील ...
स्त्रीरोग विभागावर सहा जिल्ह्यांचा भार
सर्वोपचार रुग्णालयासह जिल्हा स्त्री रुग्णालयात अकोल्यासह बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि हिंगोली या जिल्ह्यांतील गर्भवती प्रसूतीसाठी येतात. त्यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात ३०० खाटा आहेत. प्रसूतीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढल्याने अतिरिक्त २०० खाटा वाढविण्यात आल्या. मात्र, मनुष्यबळाअभावी त्यांचा उपयोग होत नसल्याची माहिती आहे. दुसरीकडे सर्वाेपचार रुग्णालयात ३० खाटांची व्यवस्था असून, येथेही खाटा कमी पडू लागल्या आहेत. खाटा वाढविल्या तरी त्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ अपुरे ठरत असल्याची माहिती आहे.
ग्रामीण रुग्णालयावर भरवसा नाही
अकोल्यातील ग्रामीण भागासह शेजारील जिल्ह्यांतही शासकीय रुग्णालये आहेत. या ठिकाणी प्राथमिक उपचार घेतला जातो. मात्र, आजार वाढला किंवा प्रसूतीसाठी स्थानिक वैद्यकीय अधिकारी त्यांना थेट अकोल्यात संदर्भित करतात. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयासह जिल्हा स्त्री रुग्णालयावरही भार वाढला आहे.
सीटी स्कॅन, एक्स-रेसाठी गर्दी
शस्त्रक्रियेपूर्वी गरजेनुसार रुग्णांना सीटी स्कॅन, एक्स-रे आणि सोनोग्राफी काढण्यास सांगितले जाते. त्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात सीटी स्कॅन, एक्स-रे आणि सोनोग्राफीसाठी रुग्णांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.