प्रकृती गंभीर होईपर्यंत रुग्ण घरीच घेताहेत उपचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:19 AM2021-04-20T04:19:20+5:302021-04-20T04:19:20+5:30
गृहविलगीकरणात सर्वाधिक रुग्ण जिल्ह्यात सद्य:स्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा चार हजारांपेक्षा जास्त आहे. यापैकी सुमारे १५०० रुग्ण रुग्णालय तसेच संस्थात्मक ...
गृहविलगीकरणात सर्वाधिक रुग्ण
जिल्ह्यात सद्य:स्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा चार हजारांपेक्षा जास्त आहे. यापैकी सुमारे १५०० रुग्ण रुग्णालय तसेच संस्थात्मक विलगीकरणात आहेत. उर्वरित सर्वच रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत.
कारणे काय? अनेक रुग्ण लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, तर काही घरीच उपचार घेतात. मात्र, प्रकृती गंभीर झाल्यानंतर असे रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. उशिरा उपचारास सुरुवात झाल्याने रुग्ण उपचारास प्रतिसाद देत नाही. तोपर्यंत रुग्णाच्या फुफ्फुसावरील इन्फेक्शन आणि ऑक्सिजनची पातळी खालावते. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.
नागरिकांनी कोविडच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. लक्षणे दिसताच नागरिकांनी कोविड चाचणी करून उपचारास सुरुवात करावी. हलगर्जीपणा जीवावर बेतू शकतो. त्यामुळे नियमित मास्क वापरा, वारंवार हात स्वच्छ धुवा तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवा.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला