तंबाखूविरोधी सप्ताहनिमित्त शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 06:36 PM2018-06-02T18:36:56+5:302018-06-02T18:36:56+5:30
अकोला: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, अकोला, रोटरी क्लब अकोला व आर. आर. कांम्बे दंत महाविदयालय, कान्हेरी सरप यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्त्री रूग्णालय, अकोला येथे शुक्रवार, १ जून रोजी मोफत स्तन कर्करोग , गर्भाशयाचा कर्करोग, मौखिक आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
अकोला: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, अकोला, रोटरी क्लब अकोला व आर. आर. कांम्बे दंत महाविदयालय, कान्हेरी सरप यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्त्री रूग्णालय, अकोला येथे शुक्रवार, १ जून रोजी मोफत स्तन कर्करोग , गर्भाशयाचा कर्करोग, मौखिक आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबीराचे उद्घाटन आरोग्य सेवा उपसंचालक तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रंसगी जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल, रोटरी क्लब अकोला चे अध्यक्ष दिनेश पारेख , भावेश ठक्कर , जयेश ओरा, जिग्नेश ओरा, संजय सारडा, कुणाल लढ्ढा, गोपाल झुनझुनवाला, कांम्बे दंत महाविदयालयाचे डॉ. आभास अरोरा, प्रा. राजेश भोयर इ. मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा तंबाखु नियंत्रण कक्षा मार्फत ३१ मे ते ६ जुन २०१८ या कालावधीत तंबाखूविरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने आयोजीत शिबीरामध्ये स्तन कर्करोग, गर्भशयाचा कर्करोगाची तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये रोटरी क्लबच्या वतीने ८६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. मौखिक आरोग्य डॉ. आभास अरोरा यांनी ८२ रुग्णांची तपासणी यांनी केली. हदय रोग, मधुमेह डॉ. रणजीत कोरडे यांनी ३१ रूग्णांची तपासणी यांनी केली.
सदर शिबीराचा यशस्वीते करिता उपसंचालक तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौव्हाण यांच्या मार्गदर्शनात डॉ. प्रिती कोगदे , धम्मसेन शिरसाट, जानराव अवघड, किरण भांडे, समता ठाकरे, धुमाळे यांनी अथक परिश्रम घेतले.