ऑक्सिजन खाटांसाठी रुग्ण दोन ते तीन तास वेटिंगवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:18 AM2021-04-24T04:18:29+5:302021-04-24T04:18:29+5:30

परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता खासगी रुग्णालयातून संदर्भित रुग्णांसह जिल्ह्याबाहेरील रुग्णांचा अतिरिक्त ताण कमी न झाल्यास सर्वोपचार रुग्णालयावरील ताण मोठ्या ...

Patients wait two to three hours for oxygen beds! | ऑक्सिजन खाटांसाठी रुग्ण दोन ते तीन तास वेटिंगवर!

ऑक्सिजन खाटांसाठी रुग्ण दोन ते तीन तास वेटिंगवर!

Next

परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता

खासगी रुग्णालयातून संदर्भित रुग्णांसह जिल्ह्याबाहेरील रुग्णांचा अतिरिक्त ताण कमी न झाल्यास सर्वोपचार रुग्णालयावरील ताण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. परिमामी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवरील मानसिक ताण वाढेल, मात्र हा ताण कमी करण्याऐवजी खासगी रुग्णालयांकडून कोविडचे गंभीर रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात संदर्भित करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास ऑक्सिजन खाटांच्या प्रतीक्षेत कोविडच्या गंभीर रुग्णांची रुग्णालय परिसरात गर्दी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

११ केएल दैनंदिन गरज

सर्वोपचार रुग्णालयात अकोल्यासह बुलडाणा आणि वाशिम तसेच नागपूर जिल्ह्यातील रुग्ण दाखल होत असल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे दिवसाला किमान ११ केएल ऑक्सिजनची गरज भासत आहे, मात्र तुलनेने पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे.

खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरविण्यावर भर

जिल्ह्यातील कोविड रुग्णांचा सर्वाधिक भार सर्वोपचार रुग्णालयावर आहे. त्या तुलनेत सर्वोपचार रुग्णालयाला आधीच ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे, मात्र सर्वोपचार रुग्णालयाच्या हिश्शाच्या ऑक्सिजनमधील ५० टक्के ऑक्सिजन खासगी रुग्णालयाकडे वळता करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून होत असल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरू आहे.

टँकर पोहोचायला लागतात २४ तास

आधी नागपूरहून ऑक्सिजन लिक्विडचा पुरवठा होत होता. त्यामुळे वेळही कमी लागत होता. मात्र आता नागपूरहून पुरवठा बंद झाल्याने पुण्यातील चाकणहून लिक्विड येते. टँकर अकोल्यात पोहोचायला २४ तास लागतात. हा साठाही सव्वा दिवसात संपून जात असल्याने पुन्हा प्रश्न पडतो, अशी स्थिती आहे.

Web Title: Patients wait two to three hours for oxygen beds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.