पिवळी शिधापत्रिकाधारक रुग्णांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:16 AM2020-12-25T04:16:07+5:302020-12-25T04:16:07+5:30
अकोला : शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न शासकीय रुग्णालयात भरती ...
अकोला : शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न शासकीय रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना रक्त व रक्त घटक मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे धर्मादाय नोंदणीकृत संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या रक्तपेढ्यांमधूनही १० टक्के रक्तपुरवठा पिवळी शिधापत्रिकाधारक रुग्णांना उपलब्धतेप्रमाणे मोफत द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
ग्राहक कायदा लाेकांपर्यंत पोहोचवा
अकोला : केंद्र शासनाकडून ग्राहकाचे सर्वोच्च हित जोपासणारा नवीन ग्राहक संरक्षण कायदा पारित करण्यात आला आहे. या कायद्यामुळे ऑनलाइन खरेदी व भ्रामक जाहिरातींद्वारे ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीस आळा बसणार आहे. या नवीन कायद्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून जनजागृती करा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी संबंधिताना दिले. अपर जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइन वेबिनारद्वारे ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ॲड. एस. एम. उंटवाले यांनी ‘ग्राहक संरक्षण कायदा-२०१९ नवीन स्वरूप’ या विषयावर मार्गदर्शन केले.
पाळीव प्राण्यांची दुकानांची नोंदणी बंधनकारक
अकोला : प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनिय, १९६०अंतर्गत पाळीव प्राणी दुकाने, श्वान प्रजनन व विपणन केंद्र हे २०१८ व २०१७ मध्ये अधिसूचित केलेले असल्याने अशा दुकानांची नोंदणी ही राज्य प्राणी कल्याण मंडळाकडे करणे बंधनकारक असून, जी केंद्र नोंदणी न करता सुरू असतील अशा केंद्रावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
मत्स्यसंवर्धन
योजनेचा लाभ घ्या
अकोला : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन योजनेकरिता पाच पिंजऱ्याकरिता अनुदानाची योजना अनुज्ञेय असून, या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी केले आहे.