भांबेरी येथे ग्रामसुरक्षा रक्षक दलाची गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:24 AM2021-07-07T04:24:33+5:302021-07-07T04:24:33+5:30
पिंजर आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार पिंजर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या मनमानीमुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत. वैद्यकीय अधिकारी ...
पिंजर आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार
पिंजर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या मनमानीमुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत. वैद्यकीय अधिकारी सकाळी १० वाजेपर्यंत येत नसल्यामुळे रुग्णांना ताटकळत बसावे लागत आहे. डॉ. किशन पंजवानी हे उशिरा येतात. रुग्णांनी जाब विचारल्यावर अरेरावी करतात. त्यामुळे त्यांची बदली करावी. अशी मागणी होत आहे.
शेतरस्ता प्रकरणी एसडीओंनी केली पाहणी
बाळापूर : तालुक्यातील शेतरस्ता प्रकरणी उपविभागीय अधिकारी डाॅ. रामेश्वर पुरी यांनी शेतकरी व अधिकाऱ्यांना सोबत पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी वहिवाटीसाठी सध्या सुरू असलेल्या प्रकरणातील रस्त्यासह अन्य रस्ताच नसल्याचे सांगितले. आता याप्रकरणी २२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
शाहिद इकबाल कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित
बार्शीटाकळी : येथील डॉ. शाहिद इकबाल खान सरफराज खान यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य पत्रकार संघ मुंबईच्यावतीने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळी पातूरचे ठाणेदार हरीश गवळी यांनीही त्यांचा सत्कार केला.
कृषी बाजार समितीचे काम बंद
मूर्तिजापूर : केंद्र शासनाने डाळींच्या साठवणुकीवर निर्बंध घातले आहेत. त्यासाठी स्टॉक लिमीट घालून दिली आहे. त्यामुळे बाजार समितीमधील अडत दुकानदार, खरेदीदारांचा या निर्णयाला विरोध आहे. त्यांनी शेतकऱ्यांकडून यापुढे माल खरेदी न करण्याचा निर्णय घेत असून, कृषी बाजार समितीमधील कामकाज बेमुदत बंद केले आहे.
निंबाेळी येथील पाणीपुरवठा योजनेचे साहित्य लंपास
तेल्हारा : तालुक्यातील निंबोळी येथील पाणीपुरवठा योजनेचे १५ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने परस्पर काढून चोरल्याची घटना ५ जुलै रोजी घडली. उपसरपंच अर्जुन नारायण बचे यांच्या तक्रारीनुसार तेल्हारा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ब्रम्ही विभागातील रोहित्र नादुरुस्त
मूर्तिजापूर : ब्रह्मी विभागातील विद्युत रोहित्र अनेक दिवसांपासून नादुरुस्त असून, रोहित्र दुरुस्त करून शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इब्राहिम घाणीवाला यांनी केली आहे.
वसंतराव नाईक यांची जयंती साजरी
बार्शीटाकळी : येथील भाजप कार्यालयात हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश वाटमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष विठ्ठल वाघ, भाजप शहराध्यक्ष श्रीराम येळवणकर, ॲड. विनोद राठोड, अरविंद राठोड, गोपाल वाटमारे, नामदेव पवार, पुष्पा रत्नपारखी आदी उपस्थित होते.
पातूर नंदापूर येथे विजेची समस्या
पातूर नंदापूर : येथे अनेक दिवसांपासून कमी दाबाच्या विजेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विजेचा दाब कमी असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालत नाहीत. पंखा, कूलर, फ्रीज ही उपकरणेसुद्धा चालत नाहीत. सरपंच सचिन लाखे यांनी तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे महावितरणला सरपंच लाखे यांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.