पातूर न.प. उपाध्यक्षपदी सय्यद अहफाजोद्दीन सय्यद ग्यासोद्दीन यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:33 AM2020-12-13T04:33:50+5:302020-12-13T04:33:50+5:30
पातूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सय्यद मुजाहिद इकबाल सय्यद मोहसीन तालेब यांनी ४ डिसेंबर रोजी पदाचा राजीनामा नगराध्यक्ष प्रभाताई ...
पातूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सय्यद मुजाहिद इकबाल सय्यद मोहसीन तालेब यांनी ४ डिसेंबर रोजी पदाचा राजीनामा नगराध्यक्ष प्रभाताई कोथळकर यांच्याकडे दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ७ डिसेंबरला उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी सभा आयोजित करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष प्रतिभाताई भीमराव कोथळकर यांनी शनिवारी (दि.११) नगर परिषदेच्या सभागृहात सभेचे आयोजन केले होते. यामध्ये सय्यद अहफाजोद्दीन सय्यद ग्यासोद्दीन यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची उपाध्यक्षपदी मुख्याधिकारी सोनाली यादव यांच्या उपस्थितीत अविरोध निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष प्रभाताई कोथळकर, गटनेते सय्यद बुऱ्हाण सय्यद नबी, मोहम्मद फैज मोहम्मद मकसूद, रूपाली सचिन सुरवाडे, सय्यद मुजाहिद एकबाल सय्यद मोहसीन, राजू उगले, वर्षा बगाडे, तुळसा गाडगे, सय्यद मुजम्मिल सय्यद जमाल, हिदायत खान रूम खान उपस्थित होते. (फोटो)