पातूरची साक्षी सोमाणी जिल्ह्यातून अव्वल
By admin | Published: June 1, 2017 01:41 AM2017-06-01T01:41:44+5:302017-06-01T01:41:44+5:30
पातूर : तुळसाबाई कावल विद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी पुरुषोत्तम सोमाणी हिने बारावीच्या परीक्षेत ९६.१६ टक्के गुण मिळविले असून, ती जिल्ह्यात अव्वल ठरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : येथील तुळसाबाई कावल विद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी पुरुषोत्तम सोमाणी हिने बारावीच्या परीक्षेत ९६.१६ टक्के गुण मिळविले असून, ती जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. साक्षीने डॉक्टर होण्याचा मानस व्यक्त केला आहे.
मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. साक्षी सोमाणी हिने बारावीच्या परीक्षेत ९६.१५ गुण मिळवून जिल्ह्यातून अव्वल स्थान मिळविले. साक्षी सोमाणी हिचे वडील जालना येथे असून, ते डॉक्टर आहेत. तिचा मोठा भाऊसुद्धा डॉक्टर आहे. वडील व भावाप्रमाणेच डॉक्टर होऊन करिअर करण्याचा साक्षीचा मानस आहे. या यशासाठी साक्षीला तुळसाबाई कावल विद्यालयातील शिक्षक व आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले.
साक्षी पुरुषोत्तम सोमाणी ही आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून, तिने ९६.१५ टक्के गुण मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे.
- राजेंद्रसिंह बायस, प्राचार्य, तु.का.कनिष्ठ महाविद्यालय, पातूर