वीज देयक भरा; महावितरणचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:18 AM2021-01-21T04:18:06+5:302021-01-21T04:18:06+5:30
‘सांडपाण्याची विल्हेवाट लावा!’ अकाेला : प्रभाग क्रमांक १९ मधील खेताननगर, पावसाळे लेआऊट, पाेस्ट काॅलनी भागात सांडपाण्याची समस्या निर्माण झाली ...
‘सांडपाण्याची विल्हेवाट लावा!’
अकाेला : प्रभाग क्रमांक १९ मधील खेताननगर, पावसाळे लेआऊट, पाेस्ट काॅलनी भागात सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या भागात नाल्यांची व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यात व खुल्या जागांमध्ये साचत आहे. यामुळे डासांची पैदास वाढली असून नागरिकांच्या जीविताला धाेका निर्माण झाल्यामुळे सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश सभागृहनेत्या याेगिता पावसाळे यांनी महापालिकेला दिले आहेत.
जलवाहिनीची दुरुस्ती सुरू !
अकाेला : सिव्हिल लाइन चाैक ते थेट जवाहरनगर चाैकापर्यंत गळती लागलेल्या जलवाहिनीतून मंगळवारी (दि. १९) लाखाे लिटर पाण्याचा अपव्यय झाल्याचे दिसून आले. यामुळे मुख्य रस्त्यावर चिखल निर्माण झाला हाेता. दरम्यान, बुधवारी महापालिकेतील जलप्रदाय विभागाच्या सूचनेनुसार संबंधित कंत्राटदाराने जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात केल्याचे दिसले.
पंचायत समितीसमाेर रस्ता रखडला
अकाेला : पंचायत समिती ते जिल्हाधिकारी कार्र्यालयापर्यंत सिमेंट रस्त्याचे निर्माण करण्यात आले. आ. गाेवर्धन शर्मा यांच्या निधीतून सदर रस्ता तयार करण्यात आला असला तरी पशुवैद्यकीय रुग्णालय ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत रस्त्याचे काम अपूर्ण स्थितीत आहे. यामुळे अकाेलेकरांना खड्ड्यातून वाट काढताना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
जलवाहिनीसाठी खाेदला खड्डा
अकाेला : गळती लागलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी जुने शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील गणेश नगरस्थित मुख्य रस्त्यालगत भला माेठा खड्डा खाेदण्यात आला आहे. मागील चाैदा दिवसांपासून तो कायम असून अद्यापही बुजविण्यात न आल्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. खड्डा बुजविण्यास दिरंगाई हाेत असल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
सिमेंट रस्त्यांच्या मध्यात विद्युत खांब
अकाेला : शहरातील टिळक राेड ते छत्रपती शिवाजी महाराज पार्कपर्यंत सिमेंट रस्त्याची निर्मिती करण्यात आली. या मार्गाला अडथळा ठरणारे विद्युत खांब व राेहित्र हटविणे गरजेचे असताना याकडे सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. या खांबांमुळे वाहनचालकांचा अपघात हाेण्याची दाट शक्यता आहे.
खदानला अतिक्रमणाचा विळखा
अकाेला : सिंधी कॅम्प परिसरात असलेल्या खदानला स्थानिक रहिवाशांनी विळखा घातला आहे. खदानच्या जागेत माती, केरकचऱ्याचा भराव घालून त्यावर पक्क्या घरांचे अतिक्रमण उभारण्यात आले आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे सांडपाण्यासह साफसफाईच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याकडे महसूल विभाग व महापालिकेच्या प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
श्रीराम द्वारसमाेर रस्त्यात अतिक्रमण
अकाेला : खुले नाट्यगृह ते फतेह अली चाैकापर्यंतच्या मुख्य रस्त्यालगत दाेन्ही बाजूने प्लास्टिक विक्रेत्यांसह फळविक्रेत्यांनी अतिक्रमण उभारले आहे. चक्क रस्त्यात साहित्यविक्रीची दुकाने थाटण्यात आल्यामुळे या मार्गावरून धड चालणेही मुश्कील झाले आहे. यामुळे अकाेलेकर त्रस्त असताना महापालिकेकडून कारवाई हाेत नसल्याचे चित्र आहे.
काेंडवाडा विभागाचे वाहन बंद
अकाेला : शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठेत माेकाट जनावरांनी ठिय्या मांडल्याचे दिसून येते. तसेच गल्लीबाेळात भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला आहे. माेकाट जनावरांना पकडण्यासाठी महापालिकेच्या काेंडवाडा विभागाकडे वाहन उपलब्ध असले तरी सदर वाहन मागील काही दिवसांपासून नादुरुस्त असल्याची माहिती आहे.
थाेर पुरुषांचे पुतळे दुर्लक्षित
अकाेला : तत्कालीन नगर परिषदेच्या कालावधीत शहराच्या मध्यभागातील प्रमुख चाैकांमध्ये थाेर पुरुषांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात आले. या पुतळ्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. आजराेजी थाेर पुरुषांचे पुतळे धुळीने माखल्याचे पाहावयास मिळत आहेत.