रस्त्यांच्या कामाचा मोबदला द्या; अन्यथा जलसमाधी घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:23 AM2021-09-24T04:23:08+5:302021-09-24T04:23:08+5:30
तेल्हारा-घोडेगाव मार्गावरील रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत सुरू होते. या कामाचे कंत्राट सुधीर कन्स्ट्रक्शन इंडिया प्रा. लि., नागपूर, ...
तेल्हारा-घोडेगाव मार्गावरील रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत सुरू होते. या कामाचे कंत्राट सुधीर कन्स्ट्रक्शन इंडिया प्रा. लि., नागपूर, गो अहेड इन्फ्रा नागपूर, राजलक्ष्मी एंटरप्राइजेस, विष्णू एंटरप्राइजेस या कंपनीने घेतले असून, या ठिकाणी वाहनांची सेवा मनीष फसाले या स्थानिक कंत्राटदारांकडून पुरविण्यात आली होती. परंतु, जानेवारी २०२० पासून कन्स्ट्रक्शन कंपनीकडून कामाचा मोबदला रक्कम देण्यास टाळाटाळ होत असून, कामावरील मजुरांचे पैसेही देणे बाकी असल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे आहे. याबाबत कंपनीशी वारंवार पत्रव्यवहार केला असून, सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय थकीत रकमेपोटी कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आली आहे. येत्या नऊ दिवसांत थकीत रक्कम न दिल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.
वांगेश्वर त्रिवेणी संगमावर घेणार जलसमाधी!
थकीत रक्कम १ ऑक्टोबरपर्यंत जमा न झाल्यास कंत्राटदार व अन्य दोन कामगारांनी येत्या २ ऑक्टोबरला वांगेश्वर त्रिवेणी संगमात कंत्राटदार मनीष माणिकराव फसाले तेल्हारा, कामगार प्रवीण विजय तायडे बेलखेड, आकाश गजानन निवाने यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. या प्रकारास प्रशासन व संबंधित यंत्रणा जबाबदार राहील. निवेदनात नमूद आहे.