अकोट व मुर्तिजापूर शहरावर विशेष लक्ष ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:25 AM2021-02-26T04:25:33+5:302021-02-26T04:25:33+5:30

अकोला - कोविड संसर्गाचा प्रार्दुभाव शहरी व ग्रामीण भागात सातत्याने मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना प्रार्दुभाव कमी करण्यासाठी अकोला ...

Pay special attention to Akot and Murtijapur | अकोट व मुर्तिजापूर शहरावर विशेष लक्ष ठेवा

अकोट व मुर्तिजापूर शहरावर विशेष लक्ष ठेवा

Next

अकोला - कोविड संसर्गाचा प्रार्दुभाव शहरी व ग्रामीण भागात सातत्याने मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना प्रार्दुभाव कमी करण्यासाठी अकोला महानगरपालिकासह मुर्तिजापूर व अकोट नगर परिषदेत संपूर्ण क्षेत्रात विशेष लक्ष देवून चाचण्याचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यानी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात कोरोनाचा वाढता प्रार्दुभावबाबत वाररुममध्ये आढावा घेण्यात आला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, जिल्हा शल्य चिकीत्सक राजकुमार चव्हाण, मनपाचे प्रभारी आयुक्त पंकज जावळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाडवे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. नितीन आंभोरे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. श्यामकुमार सिरसाम, उपविभागीय अधिकारी सचिन कदम, आदि उपस्थित होते.

जिल्ह्यात लागू करण्यात आलेले संचारबंदीचे सक्तीने पालन करुन अनावश्यक घराबाहेर जावू नये, प्रत्येक कोरोना रुग्णांनी आधार कार्ड किवा रेशन कार्ड सोबत आणणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्रातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आहे त्या भागात संपर्कातील व्यक्तीचा शोध घेवून चाचण्याचे प्रमाण वाढवावे. होम आसोलेशन सद्यास्थिती, आसोलेशनमधील रुग्णांना शिक्के मारणे तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांबाबत यावेळी आढावा घेतला. होमआयसोलेशन नियमाचे पालन न करण्याऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करावे, इत्यादी सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

Web Title: Pay special attention to Akot and Murtijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.