वीज बिलाचा भरणा करून केला पाणी पुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:47 AM2017-10-25T00:47:52+5:302017-10-25T00:48:23+5:30
वॉर्ड क्र. ३,४, ५ या तीन वॉर्डांमधील नागरिकांना मागील दीड महिन्यापासून पाणी पुरवठा केला जात नव्हता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २४ ऑक्टोबरच्या अंकात ठळकपणे प्रकाशित केल्यानंतर महान ग्रामपंचायतला जाग येऊन वीज बिलाचा भरणा केला. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत झाल्याने तीन वॉर्डांतील नागरिकांना आता पाणी मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
महान : महान ग्रामपंचायतने वीज बिल न भरल्यामुळे महावि तरण कंपनीने पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा दीड महिन्यां पूर्वी खंडित केला होता. त्यामुळे गावातील दोन वॉर्डांतील नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करून त्यांना पाणी पुरवठा केला जात होता; परंतु वॉर्ड क्र. ३,४, ५ या तीन वॉर्डांमधील नागरिकांना मागील दीड महिन्यापासून पाणी पुरवठा केला जात नव्हता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २४ ऑक्टोबरच्या अंकात ठळकपणे प्रकाशित केल्यानंतर महान ग्रामपंचायतला जाग येऊन वीज बिलाचा भरणा केला. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत झाल्याने तीन वॉर्डांतील नागरिकांना आता पाणी मिळणार आहे.
महावितरणचे पाणी पुरवठा योजनेसाठी वीज पुरवठय़ाचे सहा लाख ५३ हजार २४0 रुपयांचे बिल ग्रामपंचायतकडे थकीत असल्याने दीड महिन्यांपूर्वी नळ योजनेचा वीज प्रवाह खंडित करण्यात आला होता. त्यानंतर महानमधील पाच वॉर्डांपैकी वॉर्ड क्रमांक १ व २ मधील २१ महेल, बिहाडमाथा, चिंचखेड झोपड पट्टीमधील नागरिकांना महाजल योजनेच्या विहिरीमधून पाणी पुरवठा होत होता; मात्र वॉर्ड क्रमांक ३, ४ व ५ मधील नागरिकांना पिण्यास पाणी दिले जात नव्हते. तिन्ही वॉर्डांतील जनता पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून वणवण भटकत होती. दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचार्यांना याबाबत विचारले असता नळ योजनेच्या खात्यामध्ये पैसे नाहीत, पाणी करवसुली झाल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही, असे उत्तर दिले जात होते. आज पाणी येईल, उद्या येईल या आशेने वाट पाहणार्या लोकांची सहनशीलता संपल्यानंतर शेवटी २२ ऑक्टोबर रोजी रात्री संतप्त नागरिकांनी महाजल योजनेच्या विहिरीवरील मुख्य जलवाहिनी व एअर व्हॉल्व्हची तोडफोड केली होती. याबाबतचे वृत्त २४ ऑक्टोबर रोजी ‘लोकमत’च्या अंकात ठळकपणे प्रकाशित होताच महान ग्रामपंचायतकडून मंगळवारी ५0 हजार रुपयांचा धनादेश वीज वितरण कंपनी बाश्रीटाकळी यांना देण्यात आला. वीज बिलाचा भरणा केल्यामुळे महावितरणने नळ योजनेचा वीज प्रवाह पुन्हा जोडला. गावकर्यांनी दाखविलेल्या एकीच्या बळाचा विजय झाल्याची चर्चा लोकांमध्ये होत आहे.
नळ योजनेच्या खात्यात पैसे नसल्याने वीज बिलाचा भरणा कर ता आला नव्हता; परंतु महानवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी होणारा त्रास पाहता ५0 हजार रुपये उसनवारीने घेऊन वीज बिलाचा भरणा केला आहे. महावितरणाच्या संबंधितांना वीज जोडणी करण्याबाबत विनवणी केल्याने २४ ऑक्टोबर रोजी नळ योजनेचा वीज प्रवाह जोडण्यात आला. त्यामुळे काही वंचि त भागात पाण्याचा पुरवठा करण्यात आला. महान नळजोडणीधारकांनी थकित पाणी कराचा भरणा येत्या आठ दिवसात करून ग्रा. पं. प्रशासनाला हातभार सहकार्य करावे.
- यास्मिन मो. इरफान, सरपंच, महान.