'पंदेकृवि'ने विकसित केली ९७ दिवसांत उत्पादन देणारी सोयाबीनची नवी जात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 03:51 PM2018-05-31T15:51:37+5:302018-05-31T15:55:51+5:30
अकोला : ९७ दिवसांत भरपूर उत्पादन देणारी सोयाबीनची नवी जात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केली असून, पुढच्या वर्षी खरीप हंगामात पेरणीसाठी ही जात उपलब्ध होणार आहे.
अकोला : ९७ दिवसांत भरपूर उत्पादन देणारी सोयाबीनची नवी जात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केली असून, पुढच्या वर्षी खरीप हंगामात पेरणीसाठी ही जात उपलब्ध होणार आहे.
राज्यात सोयाबीन तेलबिया पिकाचे क्षेत्र वाढले असून, तेलाची मागणीही वाढल्याने शेतकऱ्यांनी या पिकाकडे लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडच्या चार, पाच वर्षांत हे क्षेत्र जवळपास ३८ ते ४० लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. यानुषंगाने भरघोस उत्पादन देणाºया सोयाबीनवर या कृषी विद्यापीठात संशोधन करण्यात येत होते. यावर्षी हे संशोधन पूर्ण झाले असून, पुढच्यावर्षी पेरणीसाठी मान्यताही प्राप्त झाली आहे. सोयाबीन उत्पादनाचा कालावधी ९० ते १०५ दिवसांचा धरला जातो; पण ९० दिवसांत येणाºया सोयाबीनची पेरणी सहसा शेतकरी करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे १०५ दिवसांत येणाºया जातीचीच पेरणी केली जाते, हा कालावधी कमी करू न हेक्टरी २२ क्विंटल उत्पादन देणारी एएमएस-१००१ (पीडीकेव्ही यलो) या नावाने नवीन जात विकसित करण्यात आली आहे. अगोदरच्या जातीपेक्षा या नवीन सोयाबीन जातीचे उत्पादन जास्त असल्याचा दावा संशोधन करणारे कृषी शास्त्रज्ञ करीत आहेत. या सोयाबीनपासून तेलाचे प्रमाणही २१ ते ४४ टक्के एवढे आहे. विषाणूजन्य रोगास प्रतिकारक असलेली ही जात आपत्कालीन परिस्थितीतही तग धरू न राहते म्हणजेच न लोळणारी, न फुटणारी ही जात आहे.
भाताचेही संशोधन
याच कृषी विद्यापीठाने १४० ते १४५ दिवसांत हेक्टरी ३८ ते ४० क्ंिवटल उत्पादन देणारी एसवायई-५०३-७८-३४-२ तिलक या नावाने बारीक आकाराचा आकर्षक दाणा असणारी भाताची जात विकसित केली. कडा-करपा रोगास ही जात प्रतिबंधक आहे.
३६ तंत्रज्ञानाच्या शिफारशी
शेतकºयांना भरघोस पीक घेता यावे, यासाठी तंत्रज्ञानाच्या ३६ शिफारशीही या कृषी विद्यापीठाने केल्या आहेत.
सोयबीनची नवीन जात भरघोस उत्पादन देणारी असून, यात तेलाचे प्रमाण भरपूर असल्याने मोठी मागणी राहील. शेतकºयांना याचा चांगला फायदा होणार आहे. भाताची जातही भरपूर उत्पादन देणारी आहे.
डॉ. विलास भाले, कुलगुरू , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.