पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक थट्टामस्करीने रंगली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:19 AM2021-03-10T04:19:58+5:302021-03-10T04:19:58+5:30
शांतता समितीच्या बैठकीत केवळ मर्जीतल्याच लोकांना आमंत्रित करण्यात आल्याचा आरोप होत आहे. बैठकीत केवळ थट्टामस्करी आणि अवांतर विषयांवर चर्चा ...
शांतता समितीच्या बैठकीत केवळ मर्जीतल्याच लोकांना आमंत्रित करण्यात आल्याचा आरोप होत आहे. बैठकीत केवळ थट्टामस्करी आणि अवांतर विषयांवर चर्चा होत असेल तर बैठक कशासाठी बोलविण्यात आली होती. असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावेळी ठाणेदार यादव यांनी, मूर्तिजापूर पोलीस स्टेशनच्या सौंदर्यीकरण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या राजकीय पक्षांकडून मदत मिळाली. मात्र इतर पक्षांकडून मदत मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी इतर पक्षांकडून मदत मिळावी असा संदेश बैठकीत दिला. या बैठकीत सण, उत्सवाच्या पृष्ठभूमीवर, सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा होणे अपेक्षित होते. तसेच शहरातील ट्रॅफिकची समस्या, चौकातले फिक्स पॉइंट, मोकाट गुरे, रात्रीची गस्त, कोरोना संक्रमण काळात घ्यावयाची काळजी आदींबाबत चर्चा अपेक्षित असताना, केवळ काही खास मर्जीतल्या लोकांसोबत गप्पागोष्टी, थट्टामस्करी करीत, ही बैठक पार पडल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याकडे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.