डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पेव्हर प्लांट प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 02:39 PM2018-12-22T14:39:34+5:302018-12-22T14:39:50+5:30
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पेव्हर प्लांट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवात्मक शिक्षणासाठी कृषी विद्यापीठाने हे एक पाऊल टाकले आहे.
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पेव्हर प्लांट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवात्मक शिक्षणासाठी कृषी विद्यापीठाने हे एक पाऊल टाकले आहे.
या पेव्हर प्लांटमध्ये कलर मिक्सर, व्हायब्रेटिंग मशीन, काँक्रि ट मिक्सर इत्यादी उपकरणे, यंत्राचा अंतर्भाव असून, कृषी स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना येथे या उपकरणाच्या माध्यमातून शिकता येणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम. बी. नागदेवे, विभाग प्रमुख डॉ. सूचिता गुप्ता, डॉ. प्रदीप गुप्ता, डॉ. सुरेंद्र काळबांडे, प्रा. राजेश मुरू मकार, प्रा. अजय तळोकार यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांचा अनुभव वाढणार असून, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व विभागांना पेव्हर्स पुरविण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन डॉ. भाले यांनी केले. अनुभवात्मक शिक्षणासोबतच चार महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान पेव्हर निर्मितीतून मिळणारा नफा प्रशिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना समप्रमाणात देण्यात येणार असल्याचे डॉ. सूचिता गुप्ता यांनी यावेळी सांगितले. कच्च्या मालापासून बनविण्यात येणाºया पेव्हर्स प्रक्रियेचे प्रात्यक्षिक उपस्थितांना यावेळी दाखविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी सागर तायडे, शुभम खिरोडकर, गौरवसिंग राजपूत, अक्षय पाटील, परमेश्वर मांजरे, अश्विनी राठोड, लक्ष्मा रेड्डी, शुभम शेलकर व अक्षय वानरे यांनी परिश्रम घेतले.