उघड्यावर शौचास बसणाऱ्या १४ जणांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 01:07 PM2019-01-20T13:07:54+5:302019-01-20T13:07:59+5:30
अकोला : हगणदरीमुक्त गावांसाठी सध्या जिल्हाभर गुड मार्निग पथक कार्यरत झाले असून, या पथकांनी उघड्यावर शौचास बसणाऱ्या १४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
अकोला : हगणदरीमुक्त गावांसाठी सध्या जिल्हाभर गुड मार्निग पथक कार्यरत झाले असून, या पथकांनी उघड्यावर शौचास बसणाऱ्या १४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण १६ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, तसेच पथकाने उघड्यावर शौचास बसणाºया ५ महिलांना समज दिली.
गुडमॉर्निंग पथकाद्वारे गावफेरी दरम्यान गृहभेटी देण्यात आल्या. शौचालय वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक, सार्वजनिक, परिसर स्वच्छता, सुंदर शौचालय स्वच्छ शौचालय स्पर्धेविषयी ध्वनीक्षेपकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत असून, अकोट तालुक्यात राबवण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान पाच महिलांना समज देण्यात आली असून मंचनपूर, सावरा, आसेगाव बाजार, कवठा येथे गुड मॉर्निंग पथकाने पाहणी केली. यावेळी उघड्यावर शौचास जाणाºया ग्रामस्थांकडून १६ हजार ८०० दंड वसूल करण्यात आला व त्यांना ग्रामपंचायतकडून पावतीही देण्यात आली. वसूल केलेला दंड ग्रामपंचायतमध्ये जमा करण्यात आला.