लाॅकडाऊनचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:19 AM2021-04-09T04:19:42+5:302021-04-09T04:19:42+5:30
कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने ५ एप्रिलपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. महापालिका क्षेत्रामध्ये सोमवार ते ...
कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने ५ एप्रिलपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. महापालिका क्षेत्रामध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत जीवनावश्यक सेवा जसे हॉस्पिटल, क्लिनिक्स, मेडिकल, विमा कार्यालये, औषध विक्रेते, इतर वैद्यकीय आरोग्य सेवेशी संबंधित घटक व पशुवैद्यकीय सेवा, किराणा दुकान, भाज्यांची दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच सर्व रेस्टारंट, हॉटेल्स, उपाहारगृह मालकांना फक्त पार्सल सुविधेची आणि होम डिलिव्हरीची मुभा देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानाव्यतिरिक्त इतर कोणतीही दुकाने, प्रतिष्ठाने सुरू ठेवल्यास संबंधितांवर पहिल्यांदा एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येईल. दुसऱ्यांदा आढळल्यास संबंधित दुकानाला तीन दिवसांसाठी सील लावण्याची कारवाई करण्यात येणार आहे. याचसोबत रस्त्यावर किंवा दुकानातून जीवनावश्यक सामग्री खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंग नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना तसेच शहरामध्ये विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना ५०० रुपये दंड आकारण्याची कारवाई केली जाणार आहे.