औद्योगिक सुरक्षेत दोषी कंपन्यांना दंड

By admin | Published: July 22, 2015 11:02 PM2015-07-22T23:02:15+5:302015-07-22T23:02:15+5:30

१७५ पैकी केवळ १५ खटले निकाली.

Penalty for companies convicted in industrial security | औद्योगिक सुरक्षेत दोषी कंपन्यांना दंड

औद्योगिक सुरक्षेत दोषी कंपन्यांना दंड

Next

अकोला : औद्योगिक वसाहतीमध्ये काम कारणार्‍या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र फॅक्ट्री अँक्टचे पालन न करणार्‍या अमरावती विभागातील ८0 कंपन्यांवर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य कार्यालयाने मागील दोन वर्षांंंत १७५ खटले दाखल केले आहेत. आतापर्यंंंत त्यापैकी केवळ १५ खटले निकाली लागले असून, दोषी कंपन्यांना ८४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. १६0 खटले अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहेत.
कर्मचार्‍यांना योग्य सुरक्षा मिळावी यासाठी राज्य शासनातर्फे महाराष्ट्र फॅक्ट्री अँक्ट लागू करण्यात आला. त्यानुसार प्रत्येक कंपनीमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना करणे बंधनकारक आहे; परंतु अनेक कंपन्या फॅक्ट्री अँक्टचे पालन करीत नसल्याने लहान-मोठे अपघात झाल्याचे निदर्शनास येते. अशा अपघातांवर अंकुश लावण्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागामार्फत कंपन्यांमध्ये बाळगल्या जाणार्‍या सुरक्षेची तपासणी करण्यात येते. मागील दोन वर्षांंंमध्ये करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान ८0 कंपन्या सुरक्षा व्यवस्था कायम राखण्यात दोषी आढळून आल्या आहेत. या कंपन्यांवर विभागातर्फे १७५ खटले चालविण्यात येत आहेत. मागील काही दिवसांत त्यापैकी १५ खटल्यांचा निकाल लागला असून, या कंपन्यांकडून ८४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अपघातग्रस्त कर्मचार्‍यांना आर्थिक लाभही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य कार्यालयामार्फत मिळाली आहे.
कंपन्या वा कारखान्यांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून तपासणी नियमीत सुरू असते. गत सहा महिन्यांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत दोषी आढळलेल्या कंपन्यांवर ६ खटले दाखल करण्यात आले असल्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे साहाय्यक संचालक धी.रा. खिरोडकर यांनी सांगीतले.

Web Title: Penalty for companies convicted in industrial security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.