शुल्क आकारुनही सेवा न देणाऱ्या मुंबई येथील मेडीकल सर्व्हीस कंपनीला अकोला ग्राहक मंचाने ठोठावला ५ लाखांचा दंड

By atul.jaiswal | Published: November 10, 2017 02:03 PM2017-11-10T14:03:30+5:302017-11-10T14:15:14+5:30

अकोला : येथील एका व्यक्तीकडून सेवाशुल्क आकारल्यानंतरही त्यांच्या नवजात बालकाची ‘युम्बिलिकल कॉर्ड’(नाळ)चे संकलन करण्याची सेवा देण्याचा करार न पाळणाºया मुंबई येथील एका वैद्यकीय सेवा पुरविणाºया कंपनीला अकोला ग्राहक मंचाने दणका दिला आहे.

A penalty of Rs 5 lakh was imposed on Medical Services Company | शुल्क आकारुनही सेवा न देणाऱ्या मुंबई येथील मेडीकल सर्व्हीस कंपनीला अकोला ग्राहक मंचाने ठोठावला ५ लाखांचा दंड

शुल्क आकारुनही सेवा न देणाऱ्या मुंबई येथील मेडीकल सर्व्हीस कंपनीला अकोला ग्राहक मंचाने ठोठावला ५ लाखांचा दंड

Next
ठळक मुद्देयुम्बिलिकल कार्ड संकलित करण्याचा पाळला नाही करारठरल्याप्रमाणे सेवा देण्यात न्यूनता व त्रुटी करीत वैद्यकीय निष्काळजीपणा केला

अकोला : येथील एका व्यक्तीकडून सेवाशुल्क आकारल्यानंतरही त्यांच्या नवजात बालकाची ‘युम्बिलिकल कॉर्ड’(नाळ)चे संकलन करण्याची सेवा देण्याचा करार न पाळणाºया मुंबई येथील एका वैद्यकीय सेवा पुरविणाºया कंपनीला अकोला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. मोठमोठी आश्वासने देऊन व चांगल्या सेवेबद्दल हमी देऊनही ऐनवेळी नकार देणाºया या कंपनीला ग्राहक मंचाने पाच लाखांचा दंड ठोठावण्याचा आदेश ६ नोव्हेंबर रोजी दिला.
अकोला येथील चार्टर्ड अकाउंटंट आयुष विजय गोयनका व निकिता आयुष गोयनका या दाम्पत्यास मूल होणार होते. त्यावेळी मुंबई येथील रिजनरेटिव्ह मेडिकल सर्व्हिसेस, प्रा. लि. या कंपनीने ६९ हजार रुपयांचे सेवा शुल्क आकारून या दाम्पत्याच्या होणाºया बाळाचे ‘युम्बिलिकल कॉर्ड’चे संकलन करण्याची सेवा देण्याचा करार केला.गत वर्षी एप्रिल महिन्यात या दोहोंमध्ये हा करार झाला. बाळंतपणाच्या वेळी मात्र सदर कंपनीने व त्यांच्या प्रतिनिधीने या दाम्पत्यास ठरल्याप्रमाणे सेवा देण्यात न्यूनता व त्रुटी करीत वैद्यकीय निष्काळजीपणा केला. कंपनीकडे सदर सेवा देण्यासाठी आधारभूत सुविधा नव्हती व बाळंतपणाच्या ठरलेल्या वेळेस कंपनीने आधी कबूल केल्याप्रमाणे आपल्या पॅनलवरील वैद्यकीय तज्ज्ञाला पाठविले नाही, तसेच स्वत:ची चूक होऊनही आधी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सेवेसाठी आकारलेले शुल्क ग्राहकाला परत केले नाही. याबाबत आयुष गोयनका यांनी १ मार्च २०१७ रोजी ग्राहक तक्रार निवारण मंच, अकोला यांच्याकडे सदर कंपनीविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. विद्यमान मंचाने सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. तक्रारकर्ता विधिज्ञ अ‍ॅड. चेतन लोहिया यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून कंपनीने सेवेमध्ये न्यूनता व त्रुटी ठेवल्याचा तसेच अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याचा निर्वाळा दिला. या प्रकरणात ग्राहकाला शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई म्हणून कंपनीला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच कंपनीने ग्राहकाकडून वसूल केलेले ६९ हजार रुपये द.सा.द.शे. आठ टक्के दराने व्याजासह ग्राहकाला परत द्यावे, असा आदेशही अध्यक्ष एस. एम. उंटवाले, भारती केतकर व डब्ल्यू. व्ही. चौधरी यांच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला. तक्रारकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. अमित लोहिया व अ‍ॅड. चेतन लोहिया यांनी काम पाहिले.

Web Title: A penalty of Rs 5 lakh was imposed on Medical Services Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.