आभाळमाया असलेली माणसे वाचायलाच हवी- जालनेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:17+5:302021-04-10T04:18:17+5:30
अकाेला : संतांची शिकवण, महापुरुषांची विचारधारा जीवनाला नवी दिशा देते. त्याचप्रमाणे आपल्या सभाेवताली आभाळमाया लाभलेली माणसे असतात. त्यांचे चरित्र ...
अकाेला : संतांची शिकवण, महापुरुषांची विचारधारा जीवनाला नवी दिशा देते. त्याचप्रमाणे आपल्या सभाेवताली आभाळमाया लाभलेली माणसे असतात. त्यांचे चरित्र समाजासमाेर येणे गरजेचे आहे. त्यातूनच दिशादर्शक नवे पर्व उदयास येईल. त्यासाठी आभाळमाया असलेली माणसे वाचायलाच हवी, असे प्रतिपादन ॲड. मुकुंद जालनेकर यांनी केले.
नाेएल स्कूलचे संस्थापक स्व. विजय मनवर यांच्या जयंती उत्सवानिमित्त ८ एप्रिल राेजी नाेएलच्या ट्रिनिटी सभागृहात आयाेजित संवाद कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी डाॅ. रूपाली सावळे लिखित ‘आभाळमाया’ या विजय मनवर यांची जीवनयात्रा असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाळेच्या सहसंस्थापिका श्रीमती सुरेखा मनवर, प्रभाताई बाळसराफ, ॲड. मुकुंद जालनेकर, प्रतिभा अवचार, प्रा. नीलेश पाकदुने, डाॅ. रूपाली सावळे, मुख्याध्यापिका अर्पणा डाेंगरे, मुख्याध्यापक अनाेश मनवर, मुख्याध्यापक अनुल मनवर यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी प्रा. डाॅ. ज. पां. खाेडके यांनी ऑनलाईनद्वारे प्रेरणादायी संदेश दिला. कार्यक्रमात लेखिका डाॅ. रूपाली सावळे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया सावरकर, आशा गावंडे यांनी मानले. आभार मुख्याध्यापक अनाेश मनवर यांनी मानले.