राजशक्तीविरोधात आता लोकशक्तीचा लढा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:36 AM2017-10-16T02:36:12+5:302017-10-16T02:37:21+5:30
अकोला : देशाच्या अर्थव्यवस्थेवरून आपल्या लेखातून टीका करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : देशाच्या अर्थव्यवस्थेवरून आपल्या लेखातून टीका करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. जीएसटीमुळे व्यापाराचे मोठे नुकसान झाले असून, नोटाबंदी सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करतानाच सरकार चुकत आहे, ते सांगितले पाहिजे आणि त्यासाठी राजशक्तीपेक्षाही मोठी शक्ती असलेल्या लोकशक्तीचा लढा उभारण्याची सुरुवात आजपासून अकोल्यात करीत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
स्थानिक प्रमिलाताई ओक हॉलमध्ये शेतकरी जागर मंचच्याव तीने ‘भारतीय अर्थव्यवस्था, नोटाबंदी, जीएसटी व शेतकरी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. मंचावर अध्यक्षस्थानी शेतकरी जागर मंचचे संस्थापक सदस्य जगदीश मुरूमकार, प्रशांत गावंडे यांच्यासह नीलिमा सिन्हा आदी उपस्थि त होते. यशवंत सिन्हा म्हणाले, की माझ्या लेखानंतर देशभरातून आलेल्या प्रतिक्रिया या देशात काहीतरी चुकत आहे, या स्पष्ट करणार्या आहेत. त्यामुळे कोणीतरी खरे सांगतो आहे, ते जाणून घेतले पाहिजे, याची चर्चा सुरू झाली. हे चांगले संकेत आहेत. चर्चा झाली पाहिजे, संवाद राहिला पाहिजे, त्यामुळे भयमुक्त लोकशाही विकसित होते म्हणूनच आता मी बोलायला सुरुवात केली आहे.
देशाची अर्थव्यवस्था सध्या विचित्र स्थितीत आहे. शेतकरी संकटात, व्यापारी त्रस्त, युवकांना नव्या नोकर्या नाहीत, त्यामुळे समाजातील कोणता घटक खुश आहे, हा प्रश्नच आहे. जीएसटी लागू केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीमध्ये प्रचंड तुटी राहिल्या. मुळातच जीएसटीमध्येच अनेक त्रुटी आहेत, त्यामुळेच हा ‘गुड अँण्ड सिम्पल’ टॅक्स न राहता ‘बॅड अँण्ड कॉम् िप्लकेटेड’ टॅक्स झाला आहे. माझा लेख प्रकाशित झाल्यानंतर या प्रश्नाला खर्या अर्थाने वाचा फुटली व सरकारवर दबाव आला. त्यामुळेच जीएसटी परिषदेची बैठक झाली. या बैठकीत काही सवलती देण्यात आल्या. ते पाहता जीएसटीमध्ये त्रुटी राहिल्या आहेत, हे एकप्रकारे सरकारनेच शिक्कामोर्तब केले आहे; मात्र या सवलतीमध्येही प्रचंड विरोधाभास व दिशाभूल केली असल्याचा आरोप करीत या विसंगती दूर करा, अन्यथा देशाच्या अर्थव्यवस् थेला मोठा धोका होईल, असा इशारा त्यांनी दिला.
नोटाबंदी ही पूर्णपणे अपयशी ठरली आहे. सर्वच व्यवहार ऑनलाइन करण्याचा निर्णय झाला. लाइनही नाही अन् ऑनही नाही, असा हा हास्यास्पद प्रकार ठरला. बदल वेगाने होत नसता त, त्याची गती किमान एका लयीत असावी, सर्वच व्यवहार ऑनलाइन केले जात नाहीत. काही व्यवहारांसाठी नगद रक्कम लागतेच; मात्र जे नगद आहे, ते सर्वच काळे धन आहे, असे कसे ठरवणार, नोटाबंदीनंतर दोन लाख शेअर कंपन्यांची व १८ लाख लोकांची चौकशी सुरू झाली आहे, हे नोटाबंदीचे वास्तव आहे, हा सरकारचा आर्थिक दहशतवाद आहे. यावर काय बोलावे, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.
या सरकारचे शेतीचे धोरणही अजबच आहे. महाराष्ट्रात नाफेडने शेतकर्यांकडून तूर, मूग, उडीद खरेदीचा निर्णय घेतला; मात्र प्र ितएकर दोन क्विटंल खरेदीची टाकलेली अट ही हास्यास्पद आहे. जर उत्पादनच एकरी पाच ते आठ क्विंटल असेल, तर खरेदीला बंधन का, ही अट तत्काळ कमी केली पाहिजे, अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. प्रारंभी प्रशांत गावंडे यांनी प्रास्ताविकातून शेतकरी जागर मंचची भूमिका मांडून केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर टीका केली. शेतमालाचा भाव असो की जमीन अधिग्रहणाचा कायदा असो, हे सरकार आमच्या जीवावर उठले आहे. त्यामुळे आम्ही लढाई हाती घेतली आहे ती कुठल्या रंगाची नाही, तर आमच्या जीवांची अन् जीवनाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जगदीश मुरूमकार यांनी शेती प्रश्नावर एक होण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मनोज तायडे, कृष्णा अंधारे, विजय देशमुख, सै.वाजीफ, दिली प मोहोड, टिना देशमुख यांच्यासह शेतकरी जागर मंचचे जिल्हाभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
अनेक मान्यवरांची व्याख्यानाला उपस्थिती
यशवंत सिन्हा यांचे विवेचन ऐकण्यासाठी माजी मंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार नतिकोद्दीन खतीब, माजी आमदार प्रकाश डहाके, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी, सहकार नेते डॉ. संतोष कोरपे, रमेश हिंगणकर, रमाकांत खेतान, o्रीकांत पिसे पाटील, डॉ.सुभाषचंद्र कोरपे, डॉ.अभय पाटील, डॉ.हर्षवर्धन मालोकार, अजय तापडिया, डॉ. रहेमान खान, प्रभेतजित बच्छेर, o्रीकृष्ण ढोरे, डॉ. स्वाती देशमुख आदींसह अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित होते.
आकडेबाजीने देशाचे भले होत नाही!
नवीन रोजगार थांबला, कर्मचारी कमी केले जात आहेत आणि आम्ही आमच्याच लोकांना भुलवत ठेवत सरकार चालवत आहोत. सरकारचे नेते आकड्यांचा खेळ करतात आणि मोठे आकडे फेकतात; मात्र आकडेबाजीच्या खेळाने विकास दा खविता येत नाही अन् देशाचे भले होत नाही. त्यासाठी ‘जीडी पी’ हे खरे स्वरूप महत्त्वाचे आहे, असा टोला त्यांनी लगावला.
‘मित्रों’ टाळणार म्हटले; पण आलेच!
यशवंत सिन्हा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना बंधू- भगिनींनो, अशी केली आणि जाणीवपूर्वक ‘मित्रों’ म्हटले नाही, असे स्पष्टीकरण दिल्यावर सभागृहात हशा उमटत टाळय़ांचा गजर झाला; मात्र सिन्हा यांनी भाषणाच्या ओघात दोन वेळा ‘मित्रों’ म्हटल्यावर त्यांनी अब क्या करे, सुनने की आदत पडी, असे सांगत दोस्तों असे म्हणणार असल्याचे स्पष्ट करून सभागृहाचे लक्ष वेधले.