ग्रामीण भागात वाढला लसीकरणाचा टक्का!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:26 AM2021-09-10T04:26:14+5:302021-09-10T04:26:14+5:30
गंभीर रुग्णांची संख्या घटण्याची शक्यता कोविड प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता कमी असते. लस घेतल्यावरही कोविडचे संक्रमण ...
गंभीर रुग्णांची संख्या घटण्याची शक्यता
कोविड प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता कमी असते.
लस घेतल्यावरही कोविडचे संक्रमण झाले, तरी त्याचे कोविडचे गंभीर परिणाम रुग्णांवर दिसून येत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सद्य:स्थितीत उद्दिष्टाच्या सुमारे ३५ टक्के लोकांनी पहिला, तर १५ टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाचा वेग असाच कायम राहिल्यास, संभाव्य तिसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या घटण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
शहरी व ग्रामीण भागात झालेले लसीकरण
तारीख - ग्रामीण - शहरी
२९ ऑगस्ट - २७२ - १,०२५
३० ऑगस्ट - १०,४२६ - १,३६३
३१ ऑगस्ट - ६,७९५ - १,५०३
१ सप्टेंबर - ५,५५८ - १,६२२
२ सप्टेंबर - ८,०३४ - १,९४७
३ सप्टेंबर - ६,८२२ - १,७५३
४ सप्टेंबर - ७,७८९ - १,८२६
५ सप्टेंबर - १,३४४ - १,२४५
६ सप्टेंबर - १,९५९ - ४१८
७ सप्टेंबर - ४,७४६ - १,४३३
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लसीकरणाचे सत्र वाढविण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी. ज्यांचा लसीचा दुसरा डोस घेणे बाकी आहे, अशा नागरिकांनी प्राधान्याने लस घ्यावी.
-डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला