अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांना दुष्काळाच्या धर्तीवर मदत - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 11:30 PM2019-11-03T23:30:00+5:302019-11-03T23:30:01+5:30

संवेदनशील राहून मिशन मोडवर काम करावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 Periodic rain; Helping farmers on drought scenario - CM | अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांना दुष्काळाच्या धर्तीवर मदत - मुख्यमंत्री

अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांना दुष्काळाच्या धर्तीवर मदत - मुख्यमंत्री

Next

अकोला: दुष्काळ निवारणासाठी ज्या उपाययोजना केल्या जातात व दूष्काळग्रस्तांना जे निकष लावून मदत दिली जाते तेच निकष अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी लागू राहतील, हा ओला दूष्काळ आहे, अध्यादेश निघेल तेव्हा निघेल; मात्र शासकीय यंत्रणांनी ६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण पंचनामे करावे तसेच संवेदनशील राहून मिशन मोडवर काम करावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी अकोल्यातील म्हैसपूर फाटा, लाखनवाडा, कापशी, चिखलगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन पीक पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार श्रीकांत देशपांडे, गोपीकिशन बाजोरिया, आ. प्रकाश भारसाकळे, गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, नितीन देशमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, यांच्यासह बळीराम शिरस्कार, महापौर विजय अग्रवाल, प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर आदी उपस्थित होते.
अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. हाती आलेले पीक निघून गेल्याने शेतकरी निराशेच्या छायेत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी झालेल्या नुकसानाची व्याप्ती सर्वात मोठी आहे. त्यामुळे यामध्ये देण्यात येणारी मदतही मोठी असणार आहे. शेतकºयांना पुन्हा उभे करण्यासाठी दुष्काळ काळातील सर्व मदत ओला दुष्काळाच्या काळातही सर्व शेतकºयांना देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेतकºयांना पुन्हा उभे करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी पंचनाम्यासाठी संवेदशीलपणे कार्य करावे, असे निर्देश देतानाच पावसामुळे जवळपास १०० टक्के शेत पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, तूर ही पिके शेतकºयांच्या हातून गेली आहे. त्यामुळे पंचनाम्याच्या कामासाठी आवश्यकता असल्यास इतर विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या मनुष्यबळाचा उपयोग करावा, असे आवाहन केले.
शेतकºयांना कोणत्याही वसुलीच्या समोर जावे लागू नये, वीज कापल्या जाऊ नये याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना सूचना कराव्यात. शेतकºयांना सुलभपणे मदत मिळावी, त्यांना सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी हेल्पलाइन सुरू करावी. नुकसानीची मदत मिळण्यासाठी पंचनामा करणाºया यंत्रणांनी अपवादही सोडू नये. शेतकºयांना मदत मिळावी, यासाठी यंत्रणेने हे आपले काम आहे, असे मानून मिशन मोडमध्ये कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी जिल्हह्यातील परिस्थितीची थोडक्यात माहिती देऊन यंत्रणांनी तत्परतेने काम करावे, असे निर्देश दिले. जिल्हाधिकारी पापळकर यांनी जिल्ह्याच्या नुकसानाच्या माहितीचे सादरीकरण केले.

 

Web Title:  Periodic rain; Helping farmers on drought scenario - CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.