आज मनपाची स्थायी सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:13 AM2021-06-30T04:13:37+5:302021-06-30T04:13:37+5:30
शहरात तीन जण काेराेनाबाधित अकाेला : महापालिका क्षेत्रात काेराेनाबाधित रुग्णांचा आलेख कमी हाेत चालली आहे. मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून ...
शहरात तीन जण काेराेनाबाधित
अकाेला : महापालिका क्षेत्रात काेराेनाबाधित रुग्णांचा आलेख कमी हाेत चालली आहे. मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार शहरातील तीन जणांना काेराेनाची लागण झाली आहे. यामध्ये पूर्व झाेनमध्ये ०, पश्चिम झाेन ०, उत्तर झाेन १ व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असली तरी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
६८७ जणांनी केली काेराेना चाचणी
अकाेला : शहराच्या विविध भागात अद्यापही काेराेनाचा प्रादुर्भाव कायम आहे. काही दिवसांपासून काेराेनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दरम्यान, काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या ६८७ जणांनी मंगळवारी चाचणी केली. यामध्ये ४३ जणांनी आरटीपीसीआर व ६४४ जणांनी रॅपिड ॲंटिजन चाचणी केली. संबंधितांचे अहवाल चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
जप्त साहित्य परत करा
अकाेला : महापालिकेच्या विद्युत व अतिक्रमण विभागाने जप्त केलेले साहित्य मनपाच्या आवारात ठेवण्यात आले असून, यामध्ये फायबर ऑप्टिक केबल, विद्युत वायर, लघु व्यावसायिकांच्या हातगाड्या आदी साहित्याचा समावेश आहे. जप्त केलेले साहित्य मागील अनेक दिवसांपासून धूळ खात पडून असून, ते परत करण्याची मागणी लघु व्यावसायिकांनी केली आहे.
पार्किंगसाठी जागा द्या!
अकाेला : शहरात नागरिकांना वाहने ठेवण्यासाठी वाहनतळ उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींना ताेंड द्यावे लागते. वाहनचालकांना त्यांची वाहने मुख्य रस्त्यालगत उभी करावी लागत असल्याने वाहतुकीची काेंडी हाेत असल्याने मनपाने पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मंगळवारी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण शिंदे यांनी मनपाकडे केली.